Delhi Hookah: दिल्ली उच्च न्यायालयाने रेस्टोरेंट आणि पबमध्ये हर्बल हुक्का विक्रीला दिली परवानगी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 16, 2021 | 7:12 PM

न्यायालयाने म्हटले की, कोविड प्रतिबंध हे कायमचे राहू शकत नाहीत. अनेक रेस्टॉरंट्स आणि बार मालकांनी हर्बल फ्लेवर्ड हुक्क्याच्या विक्री आणि सेवेवर बंदीच्या विरोधात याचिका दाखल केल्या होत्या, त्या याचिकांवर सुनावणी झाली.

Delhi Hookah: दिल्ली उच्च न्यायालयाने रेस्टोरेंट आणि पबमध्ये हर्बल हुक्का विक्रीला दिली परवानगी
Hookah Representative image
Follow us

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये (Restaurants and Bars) हर्बल हुक्का (Herbal hookah) वापरण्याची परवानगी दिली. न्यायालयाने म्हटले की, कोविड प्रतिबंध हे कायमचे राहू शकत नाहीत. अनेक रेस्टॉरंट्स आणि बार मालकांनी हर्बल फ्लेवर्ड हुक्क्याच्या विक्री आणि सेवेवरच्या बंदीच्या विरोधात याचिका दाखल केल्या होत्या, त्या याचिकांवर सुनावणी झाली.

न्यायमूर्ती रेखा पल्ली म्हणाल्या की, कोविड -19 च्या कारणास्तव लादलेले प्रतिबंध “कायमचे चालू शकत नाहीत” आणि सांगितले की अधिकाऱ्यांनी आधीच सिनेमा हॉल आणि स्विमिंग पूलला पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी दिली आहे. अंतरिम दिलासा म्हणून परवानगी देत असल्याचे, न्यायमूर्ती पल्ली यांनी स्पष्ट केले. बार आणि रेस्टॉरंट्सन आश्वासन देतील की सर्व कोरोनाव्हायरस प्रोटोकॉलचे पालन करून फक्त हर्बल हुक्का विक्री केली जाईल, असं त्या म्हणाल्या.

“याचिकाकर्त्यांनी हमीपत्र दाखल केल्यावर, पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत, दिल्ली सरकार हर्बल हुक्क्याच्या सेवेत हस्तक्षेप करण्यास प्रतिबंधित राहील,” न्यायाधीशांनी सांगितले.

या याचीकेची पुढील सुनावणी 9 फेब्रुवारीला होणार आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच याचिका दाखल केल्या गेल्या होत्या की हर्बल हुक्का वापरण्यासाठी कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसते, कारण त्यात तंबाखूचा वापर नसतो. मात्र, तरीही पोलीस छापे टाकून जप्ती करत होते. मात्र, दिल्ली सरकारचं म्हण्ण होतं की सार्वजनिक ठिकाणी हुक्का वापरल्यास कोविडचा प्रसार होऊ शकतो.

इतर बातम्या-

Delhi Air Pollution: सोमवारपासून 1 आठवडा शाळा बंद, सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना, वायू प्रदूषणामूळे दिल्लीची परिस्थिती धोकादायक

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ED आणि CBI प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवला

Purvanchal Expressway: पंतप्रधान मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130 हरक्यूलिस विमानाने एक्सप्रेसवेवर उतरले, देशातल्या पहिल्या हायवे एयर लँडिंग स्ट्रिपचं केलं उद्घाटन


Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI