AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ED आणि CBI प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवला

नवीन अध्यादेशानुसार सीबीआय आणि ईडी प्रमुखांची नियुक्ती पहिल्या दोन वर्षांसाठी केली जाणार आहे. यानंतर, तीन वर्षांसाठी (1+1+1) मुदतवाढ दिली जाईल. प्रत्येकी एक वर्षासाठी तीन मुदतवाढ दिली जाऊ शकते. मात्र, ते एकूण 5 वर्षांपेक्षा जास्त असू नाही शकत.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ED आणि CBI प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवला
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 5:06 PM
Share

केंद्र सरकारने आज अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि सीबीआयच्या (CBI) प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दोन्ही तपास यंत्रणांच्या संचालकांची नियुक्ती दोन वर्षांच्या ठराविक कालावधीसाठी केली जात होती. सध्या देशात सीबीआयचे प्रमुख सुबोध जैस्वाल आणि ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा आहेत. (The Government of India brings Ordinance to extend the tenure of Enforcement Directorate and Central Bureau of Investigation Directors up to 5 years).

नवीन अध्यादेशानुसार सीबीआय आणि ईडी प्रमुखांची नियुक्ती पहिल्या दोन वर्षांसाठी केली जाणार आहे. यानंतर, तीन वर्षांसाठी (1+1+1) मुदतवाढ दिली जाईल. प्रत्येकी एक वर्षासाठी तीन मुदतवाढ दिली जाऊ शकते. मात्र, ते एकूण 5 वर्षांपेक्षा जास्त असू नाही शकत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, 2018 मध्ये जारी करण्यात आलेल्या नियुक्ती आदेशात बदल करून केंद्र सरकारने ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला होता. मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपला होता परंतु त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

1997 पूर्वी सीबीआय संचालकांचा कार्यकाळ निश्चित नव्हता आणि सरकार त्यांची कधीही बदली करू शकत होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने विनीत नारायण यांच्या निकालात सीबीआय संचालकांना स्वतंत्रपणे काम करण्याची परवानगी देण्यासाठी किमान दोन वर्षांचा कार्यकाळ निश्चित केला होता.

हे ही वाचा

VIDEO: फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती; विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ

UP Elections 2022: जिन्नांना पाठिंबा देणारेच तालिबान समर्थक आहेत- योगींची विरोधकांवर टीका

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.