AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांचा अख्खा चेहरा धुराने…CPR देणाऱ्या वसीमनं सांगितलं दिल्ली आगीचं हादवरणारं सत्य!

बहुसंख्य लोक हे आगीत होरपळलेले नव्हते. परंतु आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे बरेच लोक बेशुद्ध पडले होते. ज्या लोकांना आम्ही सीपीआर दिला, त्यांचा चेहरा धुराने काळा पडला होता, असे बचावकार्य करणाऱ्याने सांगितले.

त्यांचा अख्खा चेहरा धुराने...CPR देणाऱ्या वसीमनं सांगितलं दिल्ली आगीचं हादवरणारं सत्य!
delhi restaurant fire
| Updated on: Jun 03, 2026 | 5:41 PM
Share

Delhi Hotel Fire : राजधानी दिल्लीमधील मालवीय नगरात बुधवारी धक्कादायक घटना घडली. येथे फ्लोरिस स्टे नावाच्या रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की त्यात तब्बल 21 जाणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशानक दलाच्या जवानांना युद्धपातळीवर आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत अनेकजण आगीत होरपळले होते. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या लोकांची मदत करण्यासाठी तेथील काही स्थानिक लोकांनी धाव घेतली. मदत करणाऱ्या स्थानिकांनी आगीच्या घटनेत नेमकं काय घडलं? याचं भीषण सत्य सांगितलं आहे.

हॉटेलमध्ये आग लागल्यानंतर….

आगीत सापडलेल्या लोकांना वसीम राजा यांनी प्रयत्न केला. “मी हौजरानी गावातील रहिवासी आहे. मी मॅक्स हॉस्पिटलमध्ये काम करतो. आपत्कालीन स्थितीत सीपीआर कसा द्यायचा याचे आम्हाला ट्रेनिंग दिलेले आहे. हॉटेलमध्ये आग लागल्यानंतर तेथील काही लोकांना आम्ही सीपीआर दिला. त्या लोकांना हॉटेलच्या बाहेर काढून रुग्णवाहिकेत टाकण्यास मदत केली,” असे वसीम राजा यांनी सांगितले.

त्या लोकांचा चेहरा धुराने काळा पडला होता

तसेच बहुसंख्य लोक हे आगीत होरपळलेले नव्हते. परंतु आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे बरेच लोक बेशुद्ध पडले होते. ज्या लोकांना आम्ही सीपीआर दिला, त्यांचा चेहरा धुराने काळा पडला होता. ते लोक आगीत जळाले नव्हते. कोणताही संकोच न करता आम्ही या लोकांना सीपीआर दिला. त्यामुळे काही लोकांचा जीव वाचला. काही लोकांना मात्र आम्ही दुर्दैवाने वाचवू शकलो नाहीत, असेही वसीम राजा यांनी सांगितले.

बेडशीटचा स्ट्रेचर म्हणून केला वापर

बचावकार्यात सहभागी झालेल्या मोहम्मद अफजल यांनाही घटनेची सविस्तर माहिती दिली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा त्या इमारतीला भीषण आग लागली होती. बाजूलाच गादी विक्री करणाऱ्याचे एक दुकान होते. त्या दुकानातून आम्ही गाद्या काढल्या आणि खाली अंथरल्या. इमारतीत अडकलेल्या काही लोकांनी यशस्वी पद्धतीने खाली उड्या मारल्या. आग खूपच भीषण होती. लोकांना बाहेर काढण्यासाठी आमच्याकडे स्ट्रेचर नव्हते. त्यामुळे आम्ही बेडशीटचा वापर स्ट्रेचर म्हणून केला. काही लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले, असेही मोहम्मद अफजल यांनी सांगितले. दरम्यान, आगीत होरपळलेल्या लोकांवर सध्या उपचार केला जात आहे.

Follow Us
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!