AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 वा 8 नव्हे तब्बल 14 लेन : भारताचा सर्वात रुंद एक्सप्रेस- वे, ट्रॅफीकची कटकट नाही की रेड सिग्नलची अडचण नाही

एकीकडे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघातामुळे ३२ तासांचा ट्रॅफीक जाम झाल्याने हा प्रशस्त मार्ग कुचकामी ठरल्याचे उघडकीस आले असताना देशातील १४ लेनच्या एक्सप्रेस वेची चर्चा सुरु आहे.

5 वा 8 नव्हे तब्बल 14 लेन : भारताचा सर्वात रुंद एक्सप्रेस- वे, ट्रॅफीकची कटकट नाही की रेड सिग्नलची अडचण नाही
भारताचा सर्वात रुंद एक्सप्रेस - वे
| Updated on: Feb 05, 2026 | 11:26 PM
Share

कोणत्याही देशाची प्रगती त्याच्या रस्त्यांवरुन मोजली जाते. भारतातही रस्ते महामार्गाचे जाळे वाढत आहे. आता देशाला सर्वात मोठा एक्सप्रेस-वे मिळाला आहे. या एक्सप्रेसवेला पाहून लोक परदेशातील महामार्ग विसरुन जातील इतका तो भव्य आहे. हा एक्सप्रेस-वे पाच किंवा आठ पदरीनसून चक्क १४ पदरी आहे. हा भारतातला सर्वात रुंद एक्सप्रेस -वे म्हटला जात आहे. या हायवेवर वाहनाने कोणत्याही ट्रॅफीक विना सुसाट वेगाने धावत असतात. आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास काही मिनिटांत संपतो.

आपण चर्चा करत आहोत दिल्ली -मेरठ एक्सप्रेस -वे ची. ज्याला आता भारताचा सर्वात रुंद एक्सप्रेस-वे मानला जातो.याच्या १४ लेन असल्याने हा एक्सप्रेस-वे केवळ देशातच नाही तर जगभरात चर्चेत आला आहे. दिल्लीतील सराय काले खां येथून सुरु होत हा महामार्ग मेरठ येथे जातो. हा एक्सप्रेस-वे सुमारे ९६ किमीचा आहे. याचा सर्वात रुंद भाग दिल्ली ते गाझियाबादच्या डासना पर्यंत आहे. येथे हा संपूर्ण १४ लेनमध्ये विस्तारतो. यातील सहा मार्गिका हायस्पीड एक्सप्रेस वे साठी आहेत. जेथे वाहनांचा कमाल वेग १०० ते १२० किमी प्रति तास ठेवता येतो. दोन्ही ४ – ४ लेनमध्ये स्थानिक ट्रॅफीक आणि नॅशनल महामार्ग जातो. त्यामुळे एक्सप्रेस आणि लोकल ट्रॅफीकचे आपसात अडथळ होत नाही.

तासांचा प्रवास आता मिनटांत

एके काळी दिल्ली ते मेरठ हे अंतर कापण्यासाठी तीन ते चार तास लागायचे. गाझियाबाद आणि आजूबाजूच्या भागात भयानत ट्रॅफीक जाम लागायचेय परंतू हा एक्सप्रेस -वे सुरु झाल्यानंतर प्रवास आता ४५ ते ५० मिनिटांत पूर्ण होतो. सिग्नल फ्री कॉरिडॉर असल्याने प्रवाशांना रेड सिग्नल किंवा ट्रॅफीक जामचा त्रास होत नाही.ज्यामुळे वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होते.

स्मार्ट, सुरक्षित आणि पर्यावरण अनुकूल

दिल्ली-मेरठ एक्सप्रेस-वे ला भविष्यातील वाहनांची संख्या पाहून डिझाईन केले आहे. रस्त्यांच्या कडे पिलर्सवर व्हर्टिकल गार्डन तयार केल्याने हिरवाई मनाला थंडावा देते. रात्री उजेडासाठी सोलर लायटिंगची सोय केली आहे. हा देशातील पहिला एक्सप्रेस वे आहे जेथे महामार्गाच्या दोन्ही कडेला सायकल ट्रॅक आणि फुटपाथ तयार केले आहेत. या शिवाय टोल प्लाझावर ANPR तंत्रज्ञान असल्याने गाड्यांना न थांबवता कारचा टोल वसुल होतो.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी