
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी (Delhi police) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ (Video) शेअर केला आहे. ज्यामध्ये लाल ट्रॅफिक लाइटसमोरून म्हणजे सिग्नल तोडून एक कार जात असल्याचं दिसतंय. त्याच वेळी, नेट लाइटवर अभिनेत्री करीना कपूरचा चेहरा दिसतो आणि ती तोच प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसते… ‘यह कौन है, जिसने मुझे पलटकर नही देखा?’ वाहतूकीचं नियम तुटू नये, यासाठी दिल्ली पोलीस कठोर शिस्त लावतात, परिश्रम घेणारे दिल्ली पोलीस, तरीही काही वाहनचालक रस्त्यावर आपला जीव धोक्यात घालून लाल सिग्नल तोडताना दिसतात. त्यामुळे लोकांनी इशारे ऐकावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी (police) ‘पू’चा अवलंब केला आहे. लोकांना वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस अशा प्रकारचे उपक्रम हाती घेत असतात. अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या माध्यमातून पोलीस लोकांना रस्ता सुरक्षेचा धडा शिकवण्याचं काम करतात. काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटूची जाहिरात लावून पोलिसांनी लोकांना ट्रॅफिकचे पालन करण्याबाबत जागरुक केले होते.
Who’s that traffic violator?
Poo likes attention, so do the traffic lights !#RoadSafety#SaturdayVibes pic.twitter.com/ZeCJfJigcb
— Delhi Police (@DelhiPolice) July 16, 2022
लाल दिवा असूनही म्हणजेच सिग्नल लागलेलं असूनही एक कार सिग्नल तोडून निघून जाते, असं दिल्ली पोलिसांच्या ट्विटर हँडलवर ट्विट केलेलया व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. ज्यावर अभिनेत्री करीना कपूर खानच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘पू’ चे पात्र ट्रॅफिकच्या लाल दिव्यात दिसत आहे. ज्यामध्ये तिचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे, करीना ‘यह कौन है, जिसने मुझे पलटकर नही देखा?’ असे म्हणताना दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी ट्विट करून लिहिले की, वाहतूक नियम तोडणारा कोण? पू ला लक्ष देणे आवडते आणि ट्रॅफिक लाइटला देखील लक्ष हवे आहे.
यापूर्वी 12 जुलैला दिल्ली वाहतूक पोलिसांनी NASA ची विश्वाची सर्वात खोल आणि तीक्ष्ण इन्फ्रारेड प्रतिमा शेअर केली होती. ज्याच्या शेजारी सीटबेल्ट घातलेल्या माणसाच्या छायाचित्रासह होते. दिल्ली पोलिसांनी ट्विटरवर पोस्टला कॅप्शन दिले होते, ‘तारे आणि चालान दिसण्यापासून टाळण्यासाठी सीट बेल्ट लावून वाहन चालवा’. मे महिन्याच्या सुरुवातीला हॅरी पॉटर डेच्या निमित्ताने दिल्ली पोलिसांनी जेके रोलिंगच्या मालिकेतील व्यक्तिरेखेची एक मेम शेअर केली होती. ज्यात लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले होते.