Delhi Blast : भारतावर 300 किलो स्फोटकांचं संकट, पुन्हा मोठा ब्लास्ट होणार? नव्या माहितीने खळबळ!
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाला. या स्फोटाप्रकरणी एकूण पाच डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले आहे. डॉक्टरांना अटक झालेली असली तरी देशावरील संकट अजूनही संपलेले नाही. अजूनही देशात कुठेतरी स्फोटकं लपवून ठेवलेली आहेत.

Delhi Red Ford Blast : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात आय20 कारमध्ये मोठा ब्लास्ट झाला. या ब्लास्टमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला तर 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. दरम्यान, या हल्ल्यामागे दहशतवादी हट होत हे आता जपळपास उघड झाले आहे. या प्रकरणाचे एकूण पाच डॉक्टरांशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता पोलीस या प्रकरणचा तपास करत असले तरी अजूनही एक संकट संपलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार अजूनही भारतात कुठेतरी तब्बल 300 किलो अमोनियम नायट्रेट कुठेतरी लपवून ठेवण्यात आलेले आहे. ज्या लोकांजवळ हे स्फोटक आहे, त्यांचा शोध घेणे अजूनही बाकी आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचा लक्ष लागलेले असून स्फोटांची दहशत अजूनही कायम आहे.
नेमकी काय माहिती समोर आली?
मिळालेल्या माहितीनुसार देशातील वेगवेगळ्या तपाससंस्थांनी आतापर्यंत तब्बल 2900 किलो स्फोटकं जप्त केली आहेत. मात्र अजूनही 300 किलो अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक देशातच कुठेतरी लपवून ठेवलेले आहे. हे 300 किलो स्फोटक कोणाकडे आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान तपाससंस्थांपुढे आहे. एकीकडे दिल्ली स्फोटाचा तपास चालू आहे. तर दुसरीकडे लपवून ठेवलेल्या 300 किलो स्फोटकाचाही शोध घेतला जात आहे. त्यासाठी दिल्ली स्फोटाशी निगडित लोकांचा शोध घेण्यासाठी देशात टिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही स्फोटकं बांगलादेशाच्या मार्गाने नेपाळ आणि नंतर भारतात आणण्यात आले. खत निर्मिती करणाऱ्या एका कंपनीतून ही चोरी करण्यात आली होती. दहशतवाद्यांनी एकूण 3200 किलो स्फोटक चोरले होते. त्यामुळेच सध्या गायब असलेल्या 300 किलो स्फोटकाचा शोध घेण्यासाठी नेपाळ-भारत या मार्गावर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अयोध्या-काशी हेते टार्गेटवर
सध्या अटक केलेल्या दहशतवाद्यांची चौकशी केली जात आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात हा स्फोट झालेला असला तरी उत्तर प्रदेशमधील मंदिर, धार्मिक स्थळ त्यांच्या टार्गेटवर होते, असे बोलले जात आहे. अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शाहिना हिने अयोध्येत स्लीपर मोड्यूल सक्रिय करून ठेवले होते. डॉ. शाहिना ही फरिदाबाद टेरर मॉड्यूलमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
