AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lal Quila Blast Update : ब्लास्टमध्ये कोणत्या गाडीचा वापर? अवघ्या काही मिनिटात लागला छडा; सर्वात मोठी अपडेट समोर

Dehli Blast News: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जखमी झाले आहेत. पोलिसांनी तातडीने स्फोटासाठी वापरलेल्या 'इको व्हॅन' गाडीचा छडा लावला. हा उच्च तीव्रतेचा स्फोट होता. परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून संशयितांचा शोध सुरू आहे.

Lal Quila Blast Update : ब्लास्टमध्ये कोणत्या गाडीचा वापर? अवघ्या काही मिनिटात लागला छडा; सर्वात मोठी अपडेट समोर
Delhi Blast Car
| Updated on: Nov 10, 2025 | 8:56 PM
Share

नवी दिल्लीकरांसाठी आजचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला आहे. दिल्लीच्या लालकिल्ल्यासमोर जोरदार स्फोट झाला आहे. एका कारमध्ये हा स्फोट झाल्यानंतर बाजूलाच असलेल्या दोन्ही कारनेही पेट घेतला. त्यासोबतच आजूबाजूच्या वाहनांनीही पेट घेतल्याने आगीचे लोळ उठले. स्फोटाचा आवाज आणि आगीचे लोळ यामुळे या परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जो तो जीव मूठीत घेऊन पळत होता. त्यामुळे या परिसरात एकच तणाव निर्माण झाला. या स्फोटात एकूण 9 जण ठार झाले असून 24 जण जखमी झाले आहेत. ज्या कारमध्ये हा स्फोट झाला ती कार कोणती होती? याचा तपास पोलिसांनी लावला आहे. अवघ्या काही मिनिटातच पोलिसांनी या कारचा तपास केला आहे.

दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर 1जवळ सोमवारी रात्री प्रचंड मोठा स्फोट झाला. प्राथमिक तपासानुसार एका इको व्हॅन (Eco Van)मध्ये हा स्फोट झाल्याचं दिसत आहे. इको व्हॅनमध्ये स्फोट झाल्याचं पोलिसांनी तात्काळ शोधून काढलं असलं तरी आता ही कार कुणाची आहे? याचा शोध घेतला जात आहे. या स्फोटात जवळच असेली एक स्कूटी आणि ऑटो रिक्शा जळून खाक झाली आहे. या शिवाय बाजूलाच असलेले अनेक वाहनेही जळून बेचिराख झाली आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज अत्यंत मोठा होता. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटल्या. काही लोकांच्या मते घटनास्थळी रक्ताचे सडे आणि आणि काचांचे तुकडे विखुरलेले होते.

सर्वच घटनास्थळी धावले

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशनमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फायर टेंडर, रुग्णवाहिका आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही तात्काळ घटनास्थळी आले. अग्निशमन दलाच्या जवानाने तात्काळ आग अटोक्यात आणली. मात्र, स्फोटाच्या तीव्रतेला हाय इंटेंसिटी ब्लास्ट म्हटलं जात आहे.

कार हळूहळू येत होती…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कारमध्ये स्फोट झाला, ती कार अत्यंत हळूहळू मेट्रो स्टेशनजवळ येत होती. या कारमध्ये तीन प्रवासीही होते, अशी माहिती मिळत आहे. हा स्फोट अत्यंत भीषण होता. एका कारमध्ये स्फोट झाला, मात्र, या स्फोटाची झळ तीन ते चार वाहनांना बसली. तज्ज्ञांच्या मते, हा बॅटरी ब्लास्ट असता तर स्फोटाची तीव्रता मर्यादित असती. पण तसं झालं नाही. त्यामुळे आता या स्फोटाचा तपास इतर यंत्रणा करण्याची शक्यता आहे.

झाडाझडती सुरू

दरम्यान, स्फोटानंतर येथील एलएनजेपी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात असंख्य रुग्ण आले असून त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, स्फोट झालेला परिसर सील करण्यात आला आहे. दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून वाहनांचा कसून तपास केला जात आहे. तसेच संशयितांची झाडाझडती घेतली जात आहे.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.