AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तब्बल 3 शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, मोठा गदारोळ, थेट..

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. ज्यानंतर खळबळ उडाली. आता तब्बल 3 राज्य शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे, ज्याने एकच खळबळ उडाली.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तब्बल 3 शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, मोठा गदारोळ, थेट..
Dharmendra Pradhan
| Updated on: Jul 27, 2026 | 10:50 AM
Share

नीट पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजला. यादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. शेवटी सरकारला विद्यार्थ्यांपुढे झुकावे लागले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री पद प्रल्हाद जोशी यांच्याकडे दिले. त्यांनी या पदाचा पदभार देखील स्वीकारला. यादरम्यानच मोठी खळबळ उडाली. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाब या तीन राज्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तब्बल तीन शिक्षणमंत्र्यांची पदे धोक्यात आली. हा मोठा झटका म्हणावा लागणार आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी डीएससी भरती परीक्षेत कथित घोटाळा झाल्याचा आरोप करत आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

नारा लोकेश यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावली. त्यांनी म्हटले की, माझ्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आणि नैतिक जबाबदारीबद्दल बोलणाऱ्यांनी अगोदर स्वत:ची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडे शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा मागण्याची मागणी करण्यात आली.

तेलंगणा भाजपचे अध्यक्ष एन. रामचंद्र राव यांनी म्हटले आहे की, जर राज्य सरकार विद्यार्थी शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत असलेली 12000 कोटी रुपयांची थकबाकी भरू शकत नसेल, तर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शिक्षण खाते आपल्याकडे ठेवू नये. नीट पेपरफुटीच्या प्रकरणावर 25 जुलै रोजी हैद्राबादमध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी रॅलीवर आक्षेप घेतला होता.

दिल्लीचे कॅबिनेट मंत्री मंजिंदर सिंग सिरसा यांनी रविवारी पंजाबच्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली. संबंध कथित प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आम आदमी पार्टी या मुद्द्यात दुटप्पी भूमिका घेत असल्याचा त्यांनी आरोप केला. लाखो रुपयांच्या देवाणघेवाणीनंतर फार्मसी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसल्याचा आरोप केला जात आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार