AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhirendra Shastri: बागेश्वर बाबांनी चिठ्ठीत लिहिला ‘पुत्रयोग’ पण चौथ्यांदाही झाली मुलगी, भक्ताने थेट… नेमकं प्रकरण काय?

Dhirendra Shastri: बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मे २०२४ मध्ये बागेश्वर शास्त्री यांनी भक्ताला बोलावून नावाची पर्ची काढली आणि दावा केला. त्यावरुन वाद सुरु झाला आहे.

Dhirendra Shastri: बागेश्वर बाबांनी चिठ्ठीत लिहिला 'पुत्रयोग' पण चौथ्यांदाही झाली मुलगी, भक्ताने थेट... नेमकं प्रकरण काय?
Dhirendra ShastriImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 1:27 PM
Share

प्रसिद्ध कथाकार आणि बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा चर्चेत आहेत. खरं तर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. “मुलगाच होईल” असा दावा करून दहा वर्षांनंतर बाळाचे नियोजन करायला लावले, पण शेवटी चौथीही मुलगीच झाल्याने आपली फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप उत्तर प्रदेशातील एका भक्ताने केला आहे. या प्रकरणी पीडित भक्ताने धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात मोठे पाऊल उचलले.

उत्तर प्रदेशातील झाशी येथील मगरवाडा भागातील रहिवासी राजेंद्र कुमार हे मार्च २०२४ पासून बागेश्वर धामला जात होते. मे २०२४ मध्ये बागेश्वर शास्त्री यांनी त्यांना बोलावून नावाची पर्ची काढली. त्या पर्चीमध्ये “पत्नीला प्रेतबाधा असून २१ पेशी करावी लागेल, त्यानंतर पुत्रयोग बनेगा” असा दावा लिखित स्वरूपात करण्यात आला होता. त्यानंतर राजेंद्र कुमार हे आनंदी झाले.

राजेंद्र कुमार यांनी उचलले मोठे पाऊल

या दाव्यावर विश्वास ठेवून राजेंद्र कुमार यांनी दहा वर्षांनंतर पुन्हा बाळाचे नियोजन केले. मात्र, नुकतेच त्यांच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. आधीच तीन मुली असताना बाबांच्या दाव्यानंतर चौथीही मुलगी झाल्याने आपली आर्थिक आणि मानसिक फसवणूक झाल्याचे राजेंद्र कुमार यांचे म्हणणे आहे. त्यानंतर राजेंद्र कुमार यांनी मोठे पाऊल उचलले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मोठे आवाहन

आपल्यासारखी फसवणूक इतर कोणाचीही होऊ नये, या उद्देशाने राजेंद्र कुमार यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे (अंनिस) धाव घेतली आहे. अंनिसचे संघटक हरीश देशमुख यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. या घटनेनंतर अंनिसने आक्रमक भूमिका घेतली आहे. “बागेश्वर शास्त्री यांनी आपले कथित चमत्कार वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करून दाखवावेत. आम्ही त्यांना एक कोटी रुपयांचे बक्षीस देऊ,” असे थेट आव्हान अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच, अशा प्रकारच्या भ्रामक दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही समितीने केले आहे. या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची...
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची शक्यता
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क..
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन अन्...
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकरी संकटात
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळे पाणावतील
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत राऊत...
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचं विधान
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार