AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhruv Rathee : बाबो…, ध्रुव राठीकडे पाण्यासारखा पैसा, कुठून कमावतो कोट्यवधींची माया, संपत्तीबद्दल मोठी अपडेट समोर

Dhruv Rathee : प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी सध्या सर्वत्र चर्चे असताना, त्याच्या संपत्तीबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे. ध्रुव याच्याकडे पाण्यासारखा पैसा असल्याचं समोर आलं असून, तो भारत की जर्मन कुठून पैसा जास्त कमावतो याबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे.

Dhruv Rathee : बाबो..., ध्रुव राठीकडे पाण्यासारखा पैसा, कुठून कमावतो कोट्यवधींची माया, संपत्तीबद्दल मोठी अपडेट समोर
Dhruv Rathee
| Updated on: Oct 12, 2026 | 11:30 AM
Share

Dhruv Rathee : प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी पुन्हा सर्वत्र चर्चेत आला आहे. राजकारण आणि देश – विदेशातील विविध विषयांवर व्हिडीओ करत ध्रुव याने कोट्यवधींची माया कमावली असून तो कुटुंबियांसोबत आलिशान आयुष्य जगत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्याची संपत्ती जवळपास 58 कोटी रुपये आहे. पण आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, ध्रुव राठी कुठून पैसा कमावतो? त्याच्या कमाईचं साधन फक्त यूट्यूब आहे की, त्याचा दुसरा कोणता व्यवसाय देखील आहे? सांगायचं झालं तर, ध्रुव याच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या देखील आहेत..

ध्रुव याच्याकडे 58 कोटींची संपत्ती असल्याचं सांगितलं जात आहेत. तर युट्यूबरकडे Tesla, Range Rover, BMW आणि Mercedes-Benz यांसारख्या महागड्या गाड्या देखील आहेत. पण त्याच्या संपत्तीबद्दल अधिकृत आकडा समोर आलेली नाही. आता असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे की, जर्मनीत राहणारा ध्रुव भारत की जर्मनी कुठून सर्वात जास्त संपत्ती कमावतो.

कशी होते ध्रुव राठीची कमाई?

ध्रुव राठी याची बहुतांश ही कमाई यूट्यूबमधून होते. त्याचे व्हिडिओ राजकारण, अर्थव्यवस्था, इतिहास, पर्यावरण आणि सामाजिक मुद्द्यांवर असतात. या व्हिडिओंना खूप जास्त लोक पाहतात आणि यूट्यूब यासाठी त्याला पैसे देखील देते. याशिवाय, जेव्हा एखाद्या व्हिडिओवर जाहिरात दाखवल्या जातात, तेव्हा त्यातून क्रिएटर्सची कमाई होते. यूट्यूबमधून होणारी कमाई ही केवळ सबस्क्राईबर्सवर अवलंबून नसते. व्हिडिओ किती लोकांनी पाहिला, दर्शक कोणत्या देशातून आहेत, व्हिडिओ किती वेळ पाहिला आणि जाहिरात करणाऱ्या कंपन्या किती खर्च करत आहेत, या सर्व गोष्टींचा कमाईवर परिणाम होतो.

ध्रुव राठी याच्या चॅनेलव्यतिरिक्त एक व्लॉग आणि एक शॉर्ट्स कंटेंट चॅनेल देखील आहे. याद्वारे तो वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. मात्र, त्यांच्या यूट्यूबवरून होणाऱ्या दरमहा कमाईचा कोणताही अधिकृत आकडा उपलब्ध नाही. अंदाजे सांगायचं झालं तर, ध्रुव महिन्याला 60 लाख रुपये कमावतो. पण याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

जर्मनी की भारत कुठून कमावतो कोट्यवधींची माया…?

यूट्यूबच्या कमाईमध्ये प्रेक्षकांची लोकेशन महत्त्वाची असतं. वेगवेगळ्या देशांमध्ये जाहिरातींचे दर वेगवेगळे असतात. त्यामुळे असं होऊ शकतं की एखाद्या व्हिडिओला भारतात जास्त व्ह्यूज मिळाले, तरीही दुसऱ्या देशातील प्रेक्षकांकडून मिळणारी प्रति व्ह्यू कमाई वेगळी असू शकते. तरीही केवळ या आधारावर हे ठरवता येत नाही की ध्रुव राठी भारतमधून जास्त कमावतात की जर्मनीमधून. त्याची भारत आणि जर्मनीमधून होणाऱ्या कमाईचे वेगवेगळे आकडे सार्वजनिकरीत्या घोषित केलेले नाहीत.

Follow Us
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...