Dhruv Rathee: पोलिसांनीच माझी माफी मागितली, माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पण… पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ध्रुव राठीसोबत नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee यूट्यूबर ध्रुव राठी याला आंदोलनाच्या दिवशी दिल्ली पोलिसांनी गुरुग्राममध्ये ताब्यात घेतले होते. आता यूट्यूबर ध्रुव राठीने एका पत्रकार परिषदेत आपल्या अटकेचा अनुभव सांगितला.

Dhruv Rathee Detained: यूट्यूबर ध्रुव राठी याला आंदोलनाच्या दिवशी दिल्ली पोलिसांनी गुरुग्राममध्ये ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सकाळी ८ वाजता ही कारवाई केली होती. दिल्ली पोलिसांनी गुरुग्राम पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली होती. आता यूट्यूबर ध्रुव राठीने एका पत्रकार परिषदेत आपल्या अटकेचा अनुभव सांगितला.
अटक केल्यानंतरचा अनुभव बोलून दाखवला
पत्रकार परिषदेत आपल्या अटकेचा अनुभव सांगताना तो म्हणाला, “सुमारे २० लोक घरात घुसले आणि मला थेट ओढत घेऊन गेले. मला गंभीर दुखापती झाल्या, कधी जिन्यावर, तर कधी फर्निचरला धडकल्यामुळे. त्यांनी माझे सर्व फोन हिसकावून घेतले. मग त्यांनी मला दाराबाहेर ओढले. मला चप्पलही घालू दिली नाही, त्यांनी मला थेट एका गाडीत टाकले आणि मग गाडीचा दरवाजा बंद करून ते मला एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात घेऊन गेले.”
ध्रुव राठीला कोठडीतही चांगली वागणूक मिळाली. त्याने ही गोष्ट सर्वांसमोर सांगितली. तो म्हणाला, “एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे, आम्ही तिथे पोहोचल्यावर ते म्हणाले, ‘सॉरी, साहेब.'” आम्ही तुमच्याशी असे वागलो. आम्हाला वरून आदेश होते. यानंतर ते माझ्याशी अतिशय चांगले वागले. त्यानंतर त्यांनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. ते मला म्हणाले, ‘तुम्हाला जे हवे ते आम्ही देऊ, पण एक गोष्ट आहे की तुम्हाला कैदेत ठेवले जाईल.'”
ध्रुव राठी म्हणाला, “त्यांनी मला सांगितले की ते तुम्हाला मोबाईल फोन देऊ शकत नाहीत. ही खूप विचित्र गोष्ट आहे, कारण अटकेत आणि नजरकैदेत असताना तुम्हाला मोबाईल फोन वापरण्याची परवानगी असते, पण इथे तुम्हाला तो वापरण्याची परवानगी नव्हती. जेव्हा तुम्हाला अटक केली जाते, तेव्हा तुम्हाला अटकेचे वॉरंट दिले जाते. याला अटकसुद्धा म्हणता येणार नाही. म्हणूनच मी याला अपहरण म्हणतो.”
ध्रुव राठीसोबत, अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही विमानातूनच अटक केली होती. अनेक आंदोलकांनी आंदोलनापूर्वीच अटक करण्यात आली होती. या सर्वांना नंतर सोडण्यात आले.
