AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2022: दिवाळीत फक्त दोनच तास उडविता येणार फटाके, 8 ते 10 चा वेळ निश्चित

पंजाबमध्ये मान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळीत फक्त दोनच तास फटाके फोडायला परवानगी असेल.

Diwali 2022: दिवाळीत फक्त दोनच तास उडविता येणार फटाके, 8 ते 10 चा वेळ निश्चित
फाटके फोडण्यावरुन झालेल्या वादातून तरुणाला संपवलेImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 12, 2022 | 10:59 PM
Share

चंदिगढ,  पंजाब सरकारने (Panjab Government) दिवाळीत फटाके (Crackers) फोडण्याची वेळ निश्चित केली आहे. पंजाबच्या भगवंत मान (Bhagwant Mann) सरकारने दिवाळीच्या रात्री फक्त 2 तासच फटाके फोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंजाबचे मंत्री गुरमीत सिंग मीत हैर यांनी दिवाळीच्या रात्री 8 ते 10 या दोन तासांसाठीच फटाके वाजवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये आता दिवाळीची आतिषबाजी फक्त दोनच तास होणार आहे.

ग्रीन फटाक्यांना आहे परवानगी

पंजाब सरकारने राज्यात फक्त ग्रीन फटाके उडवण्यास परवानगी दिली आहे. याबाबत पंजाब सरकारच्या पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.

प्रकाश पर्वासाठी फटाक्यांची वेळ निश्चित

यासोबतच दिवाळी व्यतिरिक्त श्रीगुरु नानक देव यांच्या प्रकाश पर्व दिवशी सकाळी 4 ते 5 आणि 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत एक तास फटाके वाजवण्याची परवानगी असेल.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाचाही निर्णय

त्याचबरोबर नाताळच्या निमित्ताने 25-26 डिसेंबर रोजी सकाळी 11.55 ते 12.30 असे  35 मिनिटे आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत रात्री 11.55 ते 12.30 वाजेपर्यंत 35 मिनिटे फटाके फोडता येणार आहे.

पंजाबमध्ये फटाक्यांची निर्मिती, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी आहे. राज्यात केवळ बेरियम क्षार किंवा अँटीमोनी, लिथियम, पारा आर्सेनिक, स्ट्रॉन्शिअम, क्रोमेट या संयुगांपासून तयार न केलेले हिरवे फटाके विकले जातील. फटाक्यांची विक्री केवळ परवानाधारक व्यापाऱ्यांमार्फतच केली जाणार असून परवानाधारक व्यापाऱ्यांनी हिरव्या फटाक्यांव्यतिरिक्त विषारी रसायनयुक्त फटाके विकले जाणार नाहीत याचीही काळजी घेतली जाईल.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?