AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला जबर हादरा! बड्या पक्षाची मोठी घोषणा, थेट लोकसभेत फटका बसणार; घडामोडींना वेग

DMK Congress Alliance : टीव्हीकेला काँग्रेसने पाठिंबा दिल्याने या डीएमकेने युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका आता लोकसभेतही बसणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काँग्रेसला जबर हादरा! बड्या पक्षाची मोठी घोषणा, थेट लोकसभेत फटका बसणार; घडामोडींना वेग
DMK CongressImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 08, 2026 | 4:29 PM
Share

तामिळनाडूत थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे. आता तामिळनाडूत विजय यांच्या पक्षाने बहुमतचा आकडा जुळवला आहे. टीव्हीकेला काँग्रेसने पाठिंबा दिल्याने या डीएमकेने युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका आता लोकसभेतही बसणार आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमकेच्या वरिष्ठ नेत्या आणि खासदार कनिमोझी यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी संसदेत आपल्या पक्षाच्या सदस्यांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था करण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे डीएमके आणि काँग्रेसमधील आघाडी आता राष्ट्रीय स्तरावरही संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आता डीएमके इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याचेही समोर आले आहे. हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

कनिमोझी यांनी 7 मे रोजी लिहिलेल्या पत्रात बदललेल्या राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत काँग्रेससोबतची आघाडी आता संपल्यामुळे लोकसभेत डीएमके खासदारांनी काँग्रेस सदस्यांसोबत बसणे योग्य राहणार नाही असं म्हटलं आहे. कनिमोझी यांनी आपल्या पत्रात म्हटले की, ‘आमची आघाडी आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे सध्याची आसनव्यवस्था कायम ठेवणे योग्य ठरणार नाही. म्हणून डीएमके संसदीय पक्षाच्या सदस्यांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था करण्यात यावी, अशी मी आपणास विनंती करते.’ डीएमके आणि काँग्रेस हे केंद्र तसेच तमिळनाडूच्या राजकारणातील दीर्घकाळचे मजबूत सहयोगी राहिले आहेत.

याचा परिणाम काय होणार?

डीएमकेच्या या निर्णयाचा परिणाम केवळ लोकसभेतील बैठक व्यवस्थेवर नव्हे तर आगामी निवडणुका आणि प्रादेशिक राजकारणावरही होण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या या पत्रातून डीएमके आता संसदेत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करू इच्छित आहे. त्यामुळे आगामी काळात हा पक्ष इंडिया आघाडीच्या विरोधातही भूमिका घेऊ शकतो.

आघाडीसाठी मोठा धक्का

डीएमकेची ही मागणी जर मान्य झाली तर लोकसभेतील आसनव्यवस्थेत बदल करण्यात येईल आणि डीएमके विरोधी पक्षांमध्ये स्वतंत्र गट म्हणून दिसेल. तामिळनाडूतील या घडामोडींमुळे विरोधी एकतेच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डीएमकेचे लोकसभेत 22 तर राज्यसभेत 8 खासदार आहेत. डीएमकेने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा घेतलेला हा निर्णय हा या आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याचा परिणाम आगामी काळात जाणविण्याची शक्यता आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?