AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे झाड चुकनही खिडकी, दरवाजाजवळ लावू नका, तर साप घरात घुसलाच म्हणून समजा, सापांचं आवडतं ठिकाण

असे काही झाडं असतात, ज्या झाडांकडे साप पावसाळ्यात आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आकर्षित होतात. अनेकदा या झाडांखाली किंवा त्या परिसरात एक तरी साप असतोच असतो. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.

हे झाड चुकनही खिडकी, दरवाजाजवळ लावू नका, तर साप घरात घुसलाच म्हणून समजा, सापांचं आवडतं ठिकाण
snake Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 12, 2026 | 6:27 PM
Share

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये सर्पदंशाचा धोका अधिक वाढतो, भारतामध्ये दर वर्षी हजारो लोक सर्पदंशामुळे मरतात. अर्थात यातील असे अनेक लोक असतात की ज्यांना वेळेत उपचार मिळू न शकल्यानं त्यांचा मृत्यू होतो. सर्पदंशानंतर तुम्हाला जर वेळेत उपचार मिळाला तर तुमचा जीव वाचू शकतो. त्यामुळे सर्पदंशानंतर वेळ वाया न घालवता तातडीने डॉक्टरकडे जाणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. जर तुम्हाला वेळेत अँण्टी व्हेनम मिळालं तर तुमचा जीव वाचू शकतो. प्रत्येक साप हा विषारीच असतो, असा फार मोठा गैरसमज भारतामध्ये सापांबद्दल असतो. त्यामुळे अनेकजण काय करतात की दिसला साप की त्याला लगेच मारतात. परंतु सगळेच साप हे काही विषारी नसतात. साप दिसला तर त्यांना मारू नका, किंवा त्यांना पकडण्याचा प्रयत्न देखील करू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या.

दरम्यान राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. पावसाळ्यात अनेकांना बाग कामाची आवड असते. परंतु अशी देखील काही झाडं असतात जी सापांना आपल्याकडे आकर्षित करतात. त्यामुळे घराशेजारी जर बाग असेल तर शक्यतो अशी झाडं लावू नयेत. पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. अशावेळी ते नेहमी कोरड्या जागेचा शोध घेत असतात. अशी काही झाडं असतात ज्या झाडांच्या पानाचा आकार मोठा असतो, त्यामुळे पावसाळ्यात सापांना या झाडाच्या पानांमध्ये आणि फांद्यांमध्ये लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते आणि पावसापासून त्यांचं संरक्षण होतं. त्यामुळे शक्यतो अशी झाडं घरापासून थोडी दूर लावली पाहिजेत.

केळीचं झाड हे देखील असंच एक झाड आहे, जे सापांना आपल्याकडे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आकर्षित करतं. केळीच्या झाडाचे पानं ही मोठी असतात, त्यामुळे या पानांमध्ये लपण्यासाठी सापांना सहज जागा मिळते, तसेच पावसापासून देखील त्यांचं संरक्षण होतं. त्यामुळे पावसाळ्यात केळीच्या झाडाखाली साप असल्याची शक्यता अधिक वाढते. तुम्ही जेव्हा हे झाडं दारा जवळ किंवा खिडकी जवळ लावतात, तेव्हा हे साप सहज तुमच्या घरात प्रवेश करतात. त्यामुळे हे झाड घरापासून थोडं दूर लावायला हवं. यापूर्वी देखील अनेकदा अशा घटना घडल्या आहेत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार