
बंगलुरु येथील इंजिनिअर अतुल सुभाष यांनी पत्नी निकीता सिंघानिया यांच्या जाचाला कंटाळून स्वत:ला संपवल्याचे प्रकरण गेल्या महिन्यात खूपच चर्चेत आले होते. या प्रकरणानंतर महिला त्यांना मिळालेल्या कायदेशीर अधिकाराचा दुरुपयोग करतात का ? यावर चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणात मागे सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या संबंधित दोन कायद्यांचा दुरुपयोग केला जात असल्याची टिप्पणी केली होती. यात आयपीसी कलम ४९८ (अ )आणि घरगुती अत्याचार विरोधी कायद्याचा उल्लेख केला होता. या दोन कायद्याच्या विरोधात जनमानस का आहे ते पाहूयात… सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या,संदर्भातील दोन कायद्यांना सर्वाधिक दुरुपयोग होणारे कायदे म्हटले होते. यात आयपीसी कलम ४९८ (अ ) आणि घरगुती अत्याचार कायद्याचा सर्वाधिक गैरवापर करणारे कायदे म्हटले होते. न्यायमूर्ती बी.आर.गवई, न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने पोटगीच्या संदर्भात सुनावणी करताना ही टिप्पणी केली होती. ...