AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुत्ते उघडाच, मग पाहा, दारू आत, कोरोना बाहेर; दारूवाल्या आंटीचा केजरीवालांना झिंगाट सल्ला!

लॉकडाऊनची घोषणा होताच दारुचा स्टॉक करून ठेवण्यासाठी दारुच्या दुकानात आलेल्या दिल्लीतील डॉली आंटीने पुन्हा एकदा सरकारला दारुचे गुत्ते उघडण्याचं आवाहन केलं आहे. (dolly aunty demand to open liquor shop in Delhi )

गुत्ते उघडाच, मग पाहा, दारू आत, कोरोना बाहेर; दारूवाल्या आंटीचा केजरीवालांना झिंगाट सल्ला!
delhi lockdown
| Updated on: Apr 27, 2021 | 5:00 PM
Share

नवी दिल्ली: लॉकडाऊनची घोषणा होताच दारुचा स्टॉक करून ठेवण्यासाठी दारुच्या दुकानात आलेल्या दिल्लीतील डॉली आंटीने पुन्हा एकदा सरकारला दारुचे गुत्ते उघडण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी, गुत्ते उघडा. मग पाहा दारू आत आणि कोरोना बाहेर जाईल, त्यामुळे तुमची डोकेदुखीही कमी होईल, असं या आंटीने म्हटलं आहे. या आंटीचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. (dolly aunty demand to open liquor shop in Delhi )

दिल्लीच्या शिवपुरी येथे डॉली आंटी राहते. या व्हिडीओतून ती केजरावाल सरकारला दारुचे गुत्ते उघडण्याची विनंती करत आहे. रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजन कमी पडत आहेत. त्याचं कारण दारुचे गुत्ते आहेत. दोन पेग लावल्यावर कोरोना मरून जाईल. पेग आत जाईल आणि कोरोना बाहेर येईल, असं ही डॉली आंटी म्हणताना दिसत आहे.

रोज पेग घेतेय, आता स्टॉक संपत आलाय

दारुचे गुत्ते उघडल्यास रुग्णालयातील बेड रिकामे होतील, असा दावाही त्यांनी केला आहे. गुत्ते उघडल्यावर बेड खाली होतील. केजरीवाल सरकारला त्यामुळे अडचणी येणार नाहीत. ऑक्सिनज सिलिंडरची समस्याही दूर होईल. लोक पिणारे आहेत. त्यांच्या पोटात दारू जाऊ द्या. कोरोना बरा होईल. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मी रोज पेग घेत आहे. परंतु आता स्टॉक संपला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊन आधीच गर्दी

दिल्लीत कोरोनाचा स्फोट झाला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अखेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाईलाजाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. 19 एप्रिलच्या रात्रीपासून हा लॉकडाऊन सुरू झाला आहे. सात दिवस लॉकडाऊन असेल. यावेळी सर्व काही बंद राहणार आहे. त्यामुळे दिल्लीत तळीराम हवालदिल झाले असून त्यांनी दारुचा स्टॉक करण्यासाठी दारुच्या दुकानांबाहेर तोबा गर्दी केली होती. लॉकडाऊनच्या आधीच तळीराम दारूच्या दुकानात गेले होते. दिल्लीतील शिवपुरी येथील गीता कॉलनीच्या एका दारुच्या दुकानात डॉली आंटीही दारू खरेदी करण्यासाठी आली होती. दारू खरेदी केल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवादही साधला. यावेळी त्यांनी दवाई से मारे को असर नही होगा, पेग से असर होगा, असं सांगत त्यांनी दारुचं महत्त्व सांगितलं होतं. (dolly aunty demand to open liquor shop in Delhi )

संबंधित बातम्या:

LIVE | मुंबईत काँग्रेसकडून जाहिरात एका कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

कोरोना संकटात आम्ही मूकदर्शक बनू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला 7 सवाल

अख्खं घरच पॉझिटिव्ह होतंय, त्यामुळे घरातही मास्क घाला, तज्ज्ञांचं ऐका; उदय सामंत यांचं आवाहन

(dolly aunty demand to open liquor shop in Delhi )

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.