AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला आणखी एक मोठा डाव, नव्या खेळीमुळे धक्का, सर्वात जवळच्या माणसाला लावलं कामाला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता अमेरिकेमधून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

भारताविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला आणखी एक मोठा डाव, नव्या खेळीमुळे धक्का, सर्वात जवळच्या माणसाला लावलं कामाला
| Updated on: Aug 23, 2025 | 2:38 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 28 ऑगस्टपासून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. एकीकडे अमेरिका भारतापासून दूर जाताना दिसत आहे, तर दुसरीकडे रशिया आणि चीनने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान टॅरिफ वार सुरू असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी 38 वर्षीय सर्जियो गोर यांना भारतामधील पुढचा राजदूत म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्जियो गोर हे डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते सध्या व्हाईट हाऊसच्या प्रेसिडेंशियल पर्सनेल ऑफिसचे डायरेक्टर आहेत. गोरे हे डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू सहकारी देखील मानले जातात. गोर यांच्यावर दक्षिण आणि मध्य आशियामधील विशेष दुताची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

जर्जियो गोर यांच्या नियुक्तीची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी अशावेळी केली आहे, ज्यावेळी अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोर यांची नियुक्ती करण्यात आल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

राजदूत म्हणून गोर यांचीच नियुक्ती का?

सर्जियो गोर यांना भारताचा काही खास अनुभव नाही, मात्र अमेरिकेच्या राजकारणात ही एक सामान्य गोष्ट आहे, राष्ट्राध्यक्ष नेहमी आपल्या खास व्यक्तींकडेच महत्त्वाची जबाबदारी देतात. जसं की अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बायडेन यांनी लॉस एंजेलिसचे माजी मेअर एरिक गार्सेटी यांना भारताचा राजदूत बनवलं होतं. मात्र तज्ज्ञांच्या मते ट्रम्प यांनी हे पाऊल याच्यासाठी उचललं असावं की, ते आता भारताला असा संदेश देऊ इच्छितात की आता वाटाघाटी थेट राष्ट्राध्यक्ष लेव्हललाच होतील.

भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, त्यातच अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी तणले गेले आहेत. तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करू नका, असं डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी आहे, मात्र भारतानं ही मागणी धुडकावून लावली आहे, भारताची रशियाकडून तेल खरेदी सुरूच आहे. तर दुसरीकडे अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर आता भारताची रशिया आणि चीनसोबत जवळीक वाढताना दिसत आहे, आम्ही भारतीय वस्तूंचं आमच्या बाजारपेठेत स्वागत करू असं रशिया आणि चीनने देखील म्हटलं आहे. त्यामुळे आता अमेरिकेला मोठा धक्का बसू शकतो.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.