
अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयाचा धडका लावला आहे. त्यांच्या काही निर्णयामुळे जगात खळबळ उडाली असून, त्याचा मोठा परिणाम हा अमेरिकेसह संबंधित देशांवर देखील होताना दिसत आहे. जसं की काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान या टॅरिफमुळे भारताची अमेरिकेत होणारी निर्यात मंदावली त्यामुळे अमेरिकेत अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवत असून, सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. दरम्यान त्यानंतर त्यांनी अचानक H-1B व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केली त्याचा थेट मोठा फटका हा भारताला बसला. कारण जगभरातून जेवढे लोक H-1B व्हिसाने अमेरिकेत जातात त्यामध्ये सत्तर टक्के लोक हे भारतीय आहेत. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचा थेट मोठा फटका हा आता भारताला बसण्याची शक्यता आहे. व्हिसा संदर्भात ट्रम्प प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे आता अमेरिकेकडून अशा महिलांना व्हिसा मिळणार नाहीये, ज्या महिला केवळ अमेरिकेचं नागरिकत्त्व मिळावं म्हणून मुलांना अमेरिकेमध्ये जन्माला घालणार आहेत. याबाबत अमेरिकन सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, जर एखादी महिला गर्भवती असेल आणि ती जर तिच्या अमेरिकन दौऱ्यामध्ये आपल्या बाळाला जन्म देणार असेल तर अशा महिलांचा व्हिसा रद्द करण्यात येणार आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता व्हिसासाठी अप्लाय करणारे विवाहित जोडपे आणि गर्भवती महिला यांची कसून तपासणी केली जाणार आहे. अमेरिकेमध्ये दिवसेंदिवस स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरू आहे, या स्थलांतराला आळा घालण्यासाठी आता ट्रम्प प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे. दरम्यान याचा फटका हा भारतीय महिलांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. कारण अनेक जण नोकरीच्या निमित्तानं अमेरिकेत असतात आणि त्यांची कुटुंब भारतात असतात, अशावेळी अमेरिकेत जाणं आता अधिक कठिण होऊ शकतं.