AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donate Cheque : काय सांगू राव, कलियुग आलंय खरोखरी! दानपेटीत 100 कोटींचा धनादेश, खात्यात म्हणाल तर..

Donate Cheque : कलियुगात काय उलथापालथ होणार आहे, हे विविध धर्मग्रंथात नमूद केले आहे. त्याचा प्रत्यय अनेकदा येतो. आता एका भक्ताने पाहा ना, देवाला सुद्धा सोडले नाही. या पठ्ठ्याने मंदिराच्या दानपेटीत 100 कोटींचा धनादेश टाकला, पण त्याच्या खात्यातील रक्कम पाहून पुजाऱ्याने आणि विश्वस्तांनी डोक्याला हात लावला. हा Cheque सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे.

Donate Cheque : काय सांगू राव, कलियुग आलंय खरोखरी! दानपेटीत 100 कोटींचा धनादेश, खात्यात म्हणाल तर..
Image Credit source: फोटो प्रतिनिधीक
| Updated on: Aug 26, 2023 | 9:00 AM
Share

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : कलियुग आलंय खरोखरी, याचा अनुभव आपल्याला क्षणोक्षणी येतो. त्याविषयीच्या अनेक कथा धर्मग्रंथात वाचायला मिळतात. कलियुगात मनुष्य कसा वागेल, याचे वर्णन त्यामध्ये सापडते. समाजात अनेक गोष्टी सामाजिक नियमांच्या विरुद्ध झाल्या की आपण लगेचच कलियुग आल्याचे पटकन बोलून जातो. लोक तर आता साक्षात देवाला पण फसवायला कमी करत नसल्याचे दिसून येते. त्यात अनेक तथाकथित बाबांचे कारनामे तर अनेकदा पाहतो. आता आंध्रप्रदेशातील एका मंदिरातील (Andhra Pradesh Temple) भक्ताचा असाच कारनामा समोर येत आहे. येथील दानपेटीत, मंदिराच्या हुंडीत (Hundi Cheque) 100 कोटींचा धनादेश सापडला. त्यामुळे मंदिराचे विश्वस्त आनंदून गेले. त्यांनी या पैशांतून भक्तांसाठी काय काय करता येईल. मंदिर परिसराचा कसा कायापालट करता येईल, याचं कोण नियोजन केले, आराखडे आखले. पण हा चेक जेव्हा वटवायला टाकला, तेव्हा दानकर्त्याच्या खात्यातील रक्कम पाहून पुजाऱ्यासह विश्वस्तांनी डोक्याला हात मारला.

भाविकांचे श्रद्धास्थान

विशाखापट्टनममधील सिम्हाचलम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिम्हा स्वामी वारी देवस्थानम हे पंचक्रोशीतच नाही तर देशातील पण अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविक मनोभावे येथे पुजाअर्चा करतात. देवाची करुणा भाकतात. येथे भक्तांची इच्छापुर्ती होते, अशी श्रद्धा आहे. अनेक राज्यातून लोक येथे दर्शनासाठी येतात.

मंदिराच्या दानपत्रात 100 कोटींचा धनादेश

या मंदिरात, व्यवस्थापन समिती, दानपेटीतील दानाची मोजणी करतात. भारतातील अनेक मंदिरात ही प्रथा आहे. या दानातून मंदिर व्यवस्थापनाला अनेक कामात मदत होते. ही रक्कम महाप्रसाद आणि इतर अनेक कामांसाठी उपयोगी पडते. मंदिराच्या दानपेटीत 100 कोटींचा धनादेश सापडला. त्यामुळे मंदिर कमिटीला आनंद झाला.

पठ्ठ्याच्या खात्यात इतकीच रक्कम

हा धनादेश कोटक महिंद्रा बँकेचा, संबंधित व्यक्तीचा होता. त्याने त्यावर 100 कोटी रुपये असे इंग्रजी अक्षरात आणि तोच आकडा पण टाकलेला होता. बँक मॅनेजरने जेव्हा हा चेक आणि खाते तपासले तेव्हा खरा उलगडा झाला. बँक व्यवस्थापकाने व्यवस्थापन समितीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार, या व्यक्तीच्या खात्यात अवघे 17 रुपये बॅलन्स होते.

फेक चेकचे प्रमाण

मंदिराच्या हुंडीत अनेक भाविक दान करतात. ही रक्कम 10 रुपये आणि त्या पटीत असते. कधी कधी मोठी रक्कम दानपेटीत येते. हे गुप्तदान असते. काही जण थेट व्यवस्थापनाकडे येऊन धनादेश देतात. काही जण हुंडीत पण धनादेश टाकतात. पण त्यापैकी काही धनादेश खोटे असल्याचे मंदिर विश्वस्तांनी सांगितले. या धनादेशावरील आकड्यांमध्ये पण अगोदर 10 लिहिले होते, नंतर ते खोडून 100 कोटींचा आकडा टाकण्यात आला. याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार देण्यात येणार की नाही, याविषयीचा खुलासा झाला नाही.

सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

हा धनादेश सोशल मीडियावर शेअर होताच. त्यावर युझर्संच्या कमेंटचा पाऊस पडला. निदान देवाला तरी सोडा, अशा अनेक कमेंट पडल्या. काहींनी हे कलियुग असल्याचा दावा केला. तर काहींनी असा प्रकार करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.