AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या वर्षात गुगलवर चूकनही सर्च करू नका ‘या’ गोष्टी, जावं लागेल थेट जेलमध्ये!

गुगल हा 21 व्या शतकात मानवाच्या हाती लागलेला माहितीचा खजिना आहे. गुगलमुळे जगात मोठी क्रांती घडून आली. आपल्याला हवी ती माहिती आपण क्षणार्धात गुगलवर सर्च करू शकतो.

नव्या वर्षात गुगलवर चूकनही सर्च करू नका 'या' गोष्टी, जावं लागेल थेट जेलमध्ये!
| Updated on: Dec 05, 2024 | 3:44 PM
Share

गुगल हा 21 व्या शतकात मानवाच्या हाती लागलेला माहितीचा खजिना आहे. गुगलच्या शोधामुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आली. आपल्याला हवी ती माहिती क्षणार्धात आपण गुगलवर शोधू शकतो. मानवी जिवनाच्या विकासामध्ये गुगलचं मोठं योगदान आहे. गुगल मॅपचा वापर करून आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी कोणत्याही गाईडसची मदत न घेता पोहोचू शकतो. मात्र गुगलचे जसे असंख्य फायदे आहेत तसेच गुगलचे काही तोटे देखील आहेत. गुगलवर विशिष्ट प्रकारची माहिती सर्च केल्यामुळे आपण अडचणीत सापडू शकतो. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत.

कोणत्या गोष्टी सर्च करू नये 

शस्त्रासांसंबधित माहिती – गुगलवर तुम्हाला हवी ती माहिती सहज मिळू शकते. मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही गुगवर सर्च केल्या तर अडचणीत सापडू शकता. तुम्ही काय सर्च करता? कुठे सर्च करता यावर लक्ष ठेवण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा असते. त्यामुळे तुम्ही जर बंदूक, तलवार व इतर शस्त्रांसंबंधित माहिती सर्च केली ते कुठे मिळतात, त्याचा वापर कसा करायचा? अशा प्रकारची माहिती सर्च केली तर तो कायद्याने गुन्हा आहे. तुम्हाला त्यासाठी जेलमध्ये जावं लागू शकतं.

बॉम्ब बनवण्याबाबत माहिती – गुगलवर तुम्हाला सर्व माहिती मिळते अगदी बॉम्ब कसा बनवायचा याची माहिती देखील तुम्हाला गुगलवर मिळते. मात्र अशा प्रकारची माहिती सर्च केल्यास तुमची रवानगी थेट जेलमध्ये होऊ शकते.

हॅकिंग संबंधित माहिती – एखाद्या व्यक्तीचा मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर वस्तू त्याची परवानगी नसताना हॅक करणं हा कायद्यानं गुन्हा आहे, त्यामुळे तुम्ही जर हॅकिंग संदर्भात माहिती सर्च करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता.

बाल गुन्हेगारीशी संबंधित माहिती – आपल्या देशामध्ये बाल गुन्हेगारीशी संबंधित कायदे खूप कडक आहेत. त्यामुळे तुम्ही तर गुगलवर या प्रकारचा मजकूर सर्च करत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला जेलमध्ये देखील जावं लागू शकतं.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.