AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्रात राहण्याची आवश्यकता नाही, परत या’, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच आवाहन

"आमचं कुठल्या भाषेबरोबर शत्रुत्व नाही. मी कुठल्या भाषेविरुद्ध नाहीय. विविधतेत एकता आपल्या राष्ट्राचा पाय आहे, असं मी मानते. पण जर तुम्ही आमची संस्कृती, भाषा मिटवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही शांततामय मार्गाने पूर्ण ताकदीने याचा विरोध करु"

'महाराष्ट्रात राहण्याची आवश्यकता नाही, परत या', या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच आवाहन
Publick
| Updated on: Jul 29, 2025 | 10:28 AM
Share

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी, राज्यात परतण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व प्रवासी मजुरांना सामाजिक सुरक्षेच आश्वासन दिलं आहे. मुंबई, उत्तर प्रदेश, राजस्थानात राहण्याची काही आवश्यकता नाही असं ममता बॅनर्जी या मजुरांना म्हणाल्या. “मी तुम्हाला ‘पीठा’ किंवा ‘पायेश’ जेवणामध्ये देऊ शकत नाही. पण आम्ही एक चपाती खात असू तर तुम्हाला सुद्धा एक चपाती मिळेल हे सुनिश्चित करु. तुम्ही इथे शांततेत राहू शकता” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. शांतीनिकेतन येथे तृणमूलच्या पहिल्या ‘भाषा आंदोलन’ मार्च आधी त्या बोलल्या की, “तुमच्याकडे पोलीस हेल्पलाइन आहे. आमच्याशी संपर्क साधा. आम्हाला सांगा तुम्हाला कधी परत यायचं आहे. आम्ही तुम्हाला परत आणू”

पश्चिम बंगालमध्ये पुढच्यावर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याआधी भाजप विरोधी आपलं आक्रमक अभियान गतीशील बनवत ‘भाषा आंदोलन’ सुरु केलं. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर मागच्या दरवाजाने NRC लागू करण्याचा कट रचल्याचा आणि बांग्लाभाषी प्रवाश्यांविरोधात ‘भाषाई दहशतवाद’ करण्याचा आरोप केला. नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापित केलेलं सांस्कृतिक स्थळ बोलपूरमधून राज्यव्यापी ‘बांग्ला भाषा आंदोलना’ ची सुरुवात केली. ‘प्राण देईन, पण मी माझी भाषा सोडणार नाही’ असं त्या म्हणाल्या.

काय आरोप केला?

मतदार यादी संशोधनाच्या आडून बंगाली अस्मिता संपवण्याचा, गरीबांना मतदान अधिकारापासून वंचित ठेवणं किंवा प्रवाशांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नाविरोधात उभं राहण्याचा संकल्प ममता बॅनर्जी यांनी बोलून दाखवला. त्यांनी आरोप केला की, “भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) नेतृत्वाखालील केंद्र सरकार, निवडणूक आयोगासोबत मिलीभगत करुन मतदार यादीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षक नावावर अल्पसंख्यक, अन्य मागास वर्ग, गरीब आणि बांग्ला भाषी मतदारांना टार्गेट करत आहे”

NRC लागू करण्याचा प्रयत्न रोखणार

वैध मतदारांची नाव हटवण्यावरुन त्यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिलं. असं काही केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला. तृणमुल काँग्रेस समर्थक आणि राज्यात परतलेले बांग्ला प्रवाशांच्या एका रॅलीच त्या नेतृत्व करत होत्या. “भाषा दहशतवादाच्या नावाखाली आमच अस्तित्व धोक्यात घालण्याचं कारस्थान आणि मागच्या दरवाजाने NRC लागू करण्याचा प्रयत्न रोखणार” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

‘…तर याचे परिणाम भोगावे लागतील’

“जो पर्यंत मी जिवंत आहे, बंगालमध्ये NRC लागू होऊ देणार नाही. मी इथे निरुद्ध शिबिर बनू देणार नाही. जर बंगालमधून नाव हटवण्याचा प्रयत्न केला, तर याचे परिणाम भोगावे लागतील” असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.