AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hypersonic Missile : पाकिस्तानला आता अजून धोपटणार, भारताने बनवलं ब्राह्मोसपेक्षा पण बाप हायपरसॉनिक मिसाइल, जाणून घ्या ताकद

Hypersonic Missile : भारताने ब्राह्मोसपेक्षा पण जास्त ताकदवान मिसाइल बनवलं आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी याच ब्राह्मोस मिसाइल्सनी पाकिस्तानची हवा काढून टाकली होती. आता DRDO ने त्यापेक्षा पण भारी ET-LDHCM मिसाइल बनवलं आहे. हे मिसाइल चीन-पाकिस्तानला पुरून उरले. याची ताकद जाणून घ्या.

Hypersonic Missile : पाकिस्तानला आता अजून धोपटणार, भारताने बनवलं ब्राह्मोसपेक्षा पण बाप हायपरसॉनिक मिसाइल, जाणून घ्या ताकद
Missile AttackImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 15, 2025 | 2:35 PM
Share

भारताने नव्या हायपरसोनिक मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. या मिसाइलच नाव एक्सटेंडेड ट्राजेक्टरी लॉन्ग ड्यूरेशन हायपरसोनिक क्रूज मिसाइल ( ET-LDHCM) आहे. या नव्या मिसाइलच वैशिष्ट्य म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा आठपट जास्त वेगाने उड्डाण करण्याची क्षमता. हे मिसाइल 1500 किलोमीटर दूर अंतरावरील लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहे. प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत DRDO ने हे मिसाइल बनवलं आहे. जगात तणाव वाढत असताना ही टेस्ट झाली आहे. भारत आपल्या संरक्षण क्षमता अत्याधुनिक बनवण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. हे मिसाइल सिक्रेसी, अचूकता आणि लवचिकता या तिन्ही बाबतीत Advance आहे.

नवीन हायपरसोनिक मिसाइल ब्रह्मोस क्रूज मिसाइलपेक्षा जास्त वेगवान आणि दूर अंतरापर्यंत जाण्यास सक्षम आहे. सध्या असलेल्या ब्रह्मोसचा स्पीड मॅक 3 (जवळपास 3675 किमी/तास) आहे. तेच ET-LDHCM मॅक 8 जवळपास 11,000 किमी/तास वेगाने उड्डाण करु शकतं. ब्रह्मोसची सुरुवातीची टार्गेट हिट करण्याची रेंज 290 किलोमीटर होती. ती वाढवून आता 450 किलोमीटर केली आहे. ET-LDHCM ची रेंज थेट 1,500 किलोमीटर आहे. यामुळे भारताच्या रणनीतिक स्ट्राइक क्षमतेमध्ये मोठी वाढ झाली आहे.

भारत कुठल्या सिस्टिमला अपग्रेड करत आहे?

सध्याची वर्तमान जागतिक परिस्थिती, भारताला चीन-पाकिस्तानकडून असलेला धोका लक्षात घेऊन भारताने आपली मिसाइल प्रणाली अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. यात ब्रह्मोस, अग्नि-5 आणि आकाश सिस्टिमला अपग्रेड करण्यात येत आहे.

हे मिसाइल रडारला का सापडत नाही?

ET-LDHCM मिसाइल स्क्रॅमजेट इंजिनावर चालतं. पारंपरिक रॉकेट इंजिनच्या जागी स्क्रॅमजेटकडून वातावरणातील ऑक्सिजनचा वापर केला जातो. यामुळे हाय स्पीड आणि दूरवरचा पल्ला गाठता येतो. कमी उंचावरुन उड्डाण करण्याच्या क्षमतेमुळे हे मिसाइल रडारला सुद्धा सापडत नाही.

कुठून हे मिसाइल लॉन्च करता येईल?

हे मिसाइल 1,000 ते 2,000 किलोग्रॅम पर्यंत पेलोड वाहून नेऊ शकतं. पारंपरिक सोबत अणवस्त्र वाहून नेण्यास हे मिसाइल सक्षम आहे. हे मिसाइल जमीन, समुद्र आणि हवा तिन्ही ठिकाणाहून लॉन्च केलं जाऊ शकतं. हे मिसाइल उड्डाणवस्थेत आपली दिशा सुद्धा बदलू शकतं. त्यामुळे शत्रूसमोर अजून आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते.

फक्त किती देशांकडे असं मिसाइल आहे?

उड्डाणा दरम्यान या मिसाइलच तापमान 2,000 डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचतं. ही टेक्नोलॉजी केवळ रशिया, अमेरिका आणि चीनकडेच आहे. ET-LDHCM चा उद्देश पाकिस्तानला कठोर संदेश आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाला संतुलित करणं आहे.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.