ISRO EOS-3 : लाँचिंगनंतर तांत्रिक बिघाड, मिशन EOS-3 फेल, कुठे चूक झाली? इस्रोने कारण सांगितलं

ISRO EOS-3 Launch News : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) इस्रोने गुरुवारी सकाळी पृथ्वीच्या निरीक्षणासाठी सोडलेलं सॅटेलाईट EOS-3 चं यशस्वी लाँचिंग झालं. मात्र काही मिनिटातच या मोहिमेला झटका बसला.

ISRO EOS-3 : लाँचिंगनंतर तांत्रिक बिघाड, मिशन EOS-3 फेल, कुठे चूक झाली? इस्रोने कारण सांगितलं
ISRO launch of GSLV-F10 EOS-03
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 9:25 AM

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) इस्रोने गुरुवारी सकाळी पृथ्वीच्या निरीक्षणासाठी सोडलेलं सॅटेलाईट EOS-3 चं यशस्वी लाँचिंग झालं. मात्र काही मिनिटातच या मोहिमेला झटका बसला. लाँचिंगनंतर काही क्षणातच तांत्रिक बिघाड आल्यामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लाँच पॅडवरुन सकाळी 5.43 वाजता पृथ्वी निरीक्षण सॅटेलाईट (EOS) प्रक्षेपित करण्यात आलं. त्यानंतर सर्व सुरळीत होतंय असं वाटत असतानाच क्रोयोजेनिक इंजनमधील आकडे बंद झाले. त्यामुळे हे मिशन अयशस्वी झाल्याची घोषणा करण्यात आली.

51.70 मीटर लांब रॉकेट GSLV0F10/ EOS-3 ने 26 तासांची उलटी गणती पूर्ण केल्यानंतर लगेचच सकाळी 5.43 वाजता यशस्वीपणे उड्डाण केलं. मात्र उड्डाणानंतर काही तांत्रिक बिघाड झाल्याचं निदर्शनास आलं.

मिशन कंट्रोलच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉकेटच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सर्व काही सामान्य होतं. मात्र काही मिनिटातच तांत्रिक बिघाड आला. त्यामुळे संचालकांनी हे मोहीम अयशस्वी ठरल्याची घोषणा केली.

ISRO प्रमुख काय म्हणाले? 

क्रायोजेनिक स्टेजमध्ये बिघाड आल्यामुळे, ही मोहीम पूर्णत: यशस्वी होऊ शकली नाही, असं या मोहिमेच्या संचालकांनी सांगितलं. तर ISRO चे अध्यक्ष के सिवन यांनीही, “क्रायोजेनिक स्टेजमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे ही मोहीम पूर्ण होऊ शकली नाही असं सांगितलं. तसंच ठरलेल्या नियोजनात ही मोहीम पूर्ण होऊ शकत नसल्याचंही ते म्हणाले.

EOS सॅटेलाईट

EOS सॅटेलाईटचं वैशिष्ट्य म्हणजे हे मुळात पृथ्वी निरीक्षण सॅटेलाईट असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीचं चित्र एकाचवेळी उपलब्ध होऊ शकलं असतं. नैसर्गिक आपत्तींदरम्यान कुठे किती प्रमाणात नुकसान होतंय त्याची माहिती एकाच क्षणात मिळू शकते. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत देण्यासाठी या सॅटेलाईटने पुरवलेल्या माहितीची मदत होऊ शकते.

शेती, जल यासह नैसर्गिक आपत्तींचा अंदाज, चक्रीवादळ, ढगफुटी यासारख्या संकटांना तोंड देण्यासाठी हा उपग्रह महत्त्वाचा ठरणार आहे.

संबंधित बातम्या   

नवं वर्ष, नवं मिशन; ISROकडून 18 सॅटेलाइटचं यशस्वी लॉन्चिंग; भगवदगीता आणि मोदींचा फोटोही अंतराळात

पंढरपूरच्या मजूर दाम्पत्याच्या मुलाची उंच भरारी, इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञपदी निवड

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.