नवं वर्ष, नवं मिशन; ISROकडून 18 सॅटेलाइटचं यशस्वी लॉन्चिंग; भगवदगीता आणि मोदींचा फोटोही अंतराळात

नव्या वर्षात भारतानं नवं मिशन हातात घेतलं आहे. (ISRO launches PSLV-C51 carrying Brazil’s Amazonia-1 and 18 other satellites)

नवं वर्ष, नवं मिशन; ISROकडून 18 सॅटेलाइटचं यशस्वी लॉन्चिंग; भगवदगीता आणि मोदींचा फोटोही अंतराळात
इस्रोचं स्पेस मिशन

श्रीहरिकोटा: नव्या वर्षात भारतानं नवं मिशन हातात घेतलं आहे. आज सकाळी इस्रो या अंतराळ संस्थेच्या पीएसएलवी-सी 51ने एकूण 18 सॅटेलाइट लॉन्च केल्या आहेत. या अभियानांतर्गत ब्राझिलच्या अमेझोनिया-1 सॅटेलाइटलाही लॉन्च केलं आहे. विशेष म्हणजे इस्रोने या सॅटेलाइटसोबत भगवदगीतेची एक इलेक्ट्रॉनिक प्रतही अंतराळात पाठवली आहे. (ISRO launches PSLV-C51 carrying Brazil’s Amazonia-1 and 18 other satellites)

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार पीएसएलव्ही-सी 51 आणि पीएसएलव्हीचं हे 53वं मिशन आहे. चेन्नईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीहरिकोटाहून हे सॅटेलाइट अंतराळात लॉन्च करण्यात आले आहेत. आज सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी हे सॅटेलाइट लॉन्च करण्यात आले आहेत. या उड्डाणाची काल शनिवारी सकाळी 8 वाजून 54 मिनिटांपासूनच काऊंटडाऊन सुरू झालं होतं.

पृथ्वीवर वॉच

भारताने आज अंतराळात पाठवलेल्या अॅमेझोनिया-१द्वारे पृथ्वीवर वॉच ठेवण्यात येणार आहे. अॅमेझोनिया उपग्रह ब्राझिलने तयार केला असून लॉन्चिंग नंतर चीन आणि ब्राझिल त्याचं संयुक्तपणे संचालन करणार आहेत. या मिशनचा कालावधी तीन वर्षाचा आहे.

जंगलांवरही लक्ष

अमेझोनिया-1 द्वारे पृथ्वीवरील जंगल तोड आणि त्याचे निरीक्षण करतील. अमेझॉनच्या जंगलात नुकतीच आग लागली होती. त्यामुळे ब्राझिलचा हा उपग्रह जंगलाच्या संवर्धनासाठी संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच या उपग्रहातून येणाऱ्या फोटोंमुळे वनस्पती आणि कृषी क्षेत्रालाही मदत मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सॅटेलाइटची संख्या कमी केली

इस्रोच्या मिशन अंतर्गत सुरुवातीला अंतराळात एकूण 20 सॅटेलाइट पाठवण्यात येणार होते. मात्र, त्यातील दोन सॅटेलाइट कमी करण्यात आले. सॉफ्टवेअर संबंधातील काही कारणांमुळे ही संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आनंद हा उपग्रह आणि पीएसएलव्ही-सी 51 हे रॉकेटही प्रक्षेपित करण्यात आलेलं नाही.

सॅटेलाइटवर मोदींचा फोटो

स्पेस किड्ज इंडियाने सतीश धवन सॅटेलाइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे सॅटेलाइटसोबत मोदींचा फोटोही अंतराळात पृथ्वीभोवती फिरताना दिसणार आहे. (ISRO launches PSLV-C51 carrying Brazil’s Amazonia-1 and 18 other satellites)

 

संबंधित बातम्या:

VIDEO | शरद पवार माझा बापच, चित्रा वाघ यांचा कंठ दाटला

Fact Check : येत्या 1 मार्चपासून कोरोनाच्या लसीसाठी खरंच 500 रुपये मोजावे लागतील?

भारताच्या महिला धावपटूचं बालपणीचं स्वप्न पूर्ण, हिमा दास थेट आसाम पोलीस विभागात अधिकारी

(ISRO launches PSLV-C51 carrying Brazil’s Amazonia-1 and 18 other satellites)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI