AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या महिला धावपटूचं बालपणीचं स्वप्न पूर्ण, हिमा दास थेट आसाम पोलीस विभागात अधिकारी

प्रसिद्ध धावपटू हिमा दासला शुक्रवारी (26 फेब्रुवारी) आसाम पोलीस विभागात उप अधीक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्त करण्यात आलंय.

भारताच्या महिला धावपटूचं बालपणीचं स्वप्न पूर्ण, हिमा दास थेट आसाम पोलीस विभागात अधिकारी
| Updated on: Feb 27, 2021 | 1:36 AM
Share

दिसपूर : प्रसिद्ध धावपटू हिमा दासला शुक्रवारी (26 फेब्रुवारी) आसाम पोलीस विभागात उप अधीक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्त करण्यात आलंय. हिमाने (Hima Das) आपल्या लहानपणी पाहिलेलं पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय. हिमाला आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आलं. गुवाहाटीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पोलीस महासंचालकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला (Hima Das appointed as as DSP in Assam for athletic work).

यावेळी हिमा म्हणाले, “मी लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा होती. मी हेच स्वप्न पाहिलं होतं. येथील लोकांना हे सर्व माहिती आहे. शालेय दिवसांपासूनच मला पोलीस अधिकारी व्हायचं होतं. माझ्या आईचं देखील हेच स्वप्न होतं. आई मला दुर्गापूजेच्या काळात खेळणं म्हणून बंदूक द्यायची. आई म्हणते आसाम पोलिसांची काम करुन मी चांगलं माणूस बनावं.”

कोण आहे हिमा दास?

हिमा दासचा जन्म आसाममधील नागाव जिल्ह्यातील कंधुलिमारी गावात झाला. तिचे वडील रणजित आणि आई जोनाली शेतकरी आहेत. भातशेती हाच त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत आहे. हिमा 4 भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे. तिला लहानपणी फुटबॉल खेळायला आवडायचं. ती शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. पुढे जवाहर नवोदय विद्यालयात तिचे शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी हिमाला फुटबॉल ऐवजी धावपटू होण्यास सांगितलं. तसेच प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तिने या काळात कमी आणि मध्यम अंतराच्या शर्यतींमध्ये भाग घेतला. पुढे नागाव स्पोर्ट्‌स असोसिएशनच्या मदतीने तिने आंतर-जिल्हा स्पर्धा खेळली. या स्पर्धांत तिने दोन सुवर्ण पदकं जिंकली.

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा (20 वर्षांखालील)

जुलै 2018 मध्ये फिनलंड येथे झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिने 51.46 सेकंदांमध्ये हे अंतर पार करत विक्रम केला.

2018 मध्ये हिमाने जकार्ता (इंडोनेशिया) येथे भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळवलं. यात तिने 50.79 सेकंदात शर्यत पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम केला. याच स्पर्धेतील मिश्र रिले स्पर्धेत (4 X 400 मीटर) हिमा दास, एम. आर. पुवम्मा, मुहम्मद अनस, राजीव आरोकीया यांच्या संघाने रौप्य पदक पटकावलं. याशिवाय हिमा दास, एम.आर. पुवम्मा, सरीता गायकवाड, व्ही.के. विस्मया यांच्या संघाने सुवर्णपदक मिळवले.

हिनाच्या या कामगिरीमुळेच तिला 2018 मध्ये भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.

हेही वाचा :

‘गोल्डन गर्ल’ हिमा दासचा पोलंडच्या स्पर्धेत नवा विक्रम

धावपटू हिमा दासची सुवर्णझेप, आणखी एक नवा विक्रम

व्हिडीओ पाहा :

Hima Das appointed as as DSP in Assam for athletic work

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.