AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | शरद पवार माझा बापच, चित्रा वाघ यांचा कंठ दाटला

आज मला पवार साहेबांची आठवण येते, साहेब मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून.... असं चित्रा वाघ सांगत होत्या (Chitra Wagh Sharad Pawar father)

VIDEO | शरद पवार माझा बापच, चित्रा वाघ यांचा कंठ दाटला
चित्रा वाघ- शरद पवार
| Updated on: Feb 28, 2021 | 9:54 AM
Share

नाशिक : “एसीबीने माझ्या पतीवर गुन्हा दाखल केल्याची बातमी समजल्यापासून मला शरद पवार (Sharad Pawar) साहेबांची खूप आठवण येत आहे, ते माझे बापच आहेत” असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. साडेतीन वर्षांपूर्वी सिल्व्हर ओकमध्ये घडलेल्या किस्स्याची आठवण चित्रा वाघ यांनी सांगितली. शरद पवारांविषयी बोलताना चित्रा वाघ यांचा कंठ दाटून आल्याचं दिसलं. (Chitra Wagh says Sharad Pawar is like father figure to her)

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

“आज मला पवार साहेबांची आठवण येते, साहेब मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून…. 5 जुलैला गुन्हा दाखल झाला, मला चांगलं आठवतंय आणि 7 जुलै… त्या दिवशी ईद होती.. 2017… मी साहेबांकडे गेले होते, सिल्व्हर ओकला बोलावलं होतं त्यांनी. माझा बापच आहे. त्यांनी बोलावून घेतलं मला, आणि मी एफआयआरची कॉपी त्यांना दिली, पंचनाम्याची कॉपी मी दिली. साहेबांनी सगळं वाचलं, म्हणाले चित्रा याच्यात तुझा नवरा कुठेच नाहीये. मी म्हटलं साहेब हेच आहे.” अशी आठवण चित्रा वाघ यांनी सांगितली.

“तुम्ही विचारता ना… हिच्या नवऱ्याचं काय?”

“त्याच्यानंतर केस उभी राहिली, कोर्टात आजही केस सुरु आहे. मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे.. तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवता ना… हिच्या नवऱ्याचं काय… माझ्या नवऱ्याने एक रुपया पण नाही घेतला, ना तो त्या ठिकाणी होता. एसीबी कॉपी देत आहे, तर महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या, माझ्या नवऱ्याने पैसे घेतले की नाही. माझा नवरा पाच किलोमीटरच्या परिघातही नव्हता.” असं चित्रा वाघ यांनी खडसावून सांगितलं.

“गृहमंत्री तुम्हाला तीनदा सॅल्यूट”

“आता हे सरकार आलं. 2011 पासून एसीबीच्या कित्येक केसेस पेंडिंग आहेत. अजून कोणावर केस दाखल झाली नाही. या प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे, ज्याने पैसे घेतले हातात, तो गांधी हॉस्पिटलचा सुपरिटेंडंट डॉ. गजानन भगत त्याचं नाव, त्याची अजून चौकशीच सुरु आहे, आणि माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करताय, वा रे वा… गृहमंत्री तुम्हाला तीनदा सॅल्यूट” असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला. (Chitra Wagh says Sharad Pawar is like father figure to her)

पाहा व्हिडीओ :

मीही शरद पवारांच्या तालमीत तयार, ते संजय राठोडांना पाठीशी घालणार नाहीत : चित्रा वाघ

नुकत्याच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेतही चित्रा वाघ यांनी शरद पवार यांच्याविषयी विश्वास व्यक्त केला होता. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या :

पवारसाहेब आज मला तुमची खूप आठवण येतेय : चित्रा वाघ

मीही शरद पवारांच्या तालमीत तयार, ते संजय राठोडांना पाठीशी घालणार नाहीत : चित्रा वाघ

(Chitra Wagh says Sharad Pawar is like father figure to her)

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.