करवॉं चौथला घरी उशीरा पोहचला, अन् जोडप्याचा दुर्दैवी अंत झाला, काय नेमकी घटना..
पती आणि पत्नीची भांडणे होत नाहीत असे घर शोधूनही सापडणार नाही. संसार म्हटला की भांड्याला भांडे वाजायचेच. भांडण झाल्यानंतर पुन्हा पती-पत्नी एकत्र येत संसाराचा गाडा पुढे हाकतात. परंतू एक विचित्र घटना घडली आहे.
करवॉं चौथला पत्नी पतीच्या आयुष्यासाठी उपवास करते आणि चाळणीतून चंद्राला पाहील्यानंतर पतीचा चेहरा पाहते. परंतू हा करवॉं चौथचा सणच दोघा पती-पत्नीच्या आयुष्य संपविणारा ठरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. करवॉं चौथला उशीर झाल्याने एका पती-पत्नीचे जोरदार भांडण झाले त्यातून या दोघांच्याही जीवनाचा प्रवास समाप्त झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे.
‘भाई मैं हार गया सॉरी, माझ्या पत्नीने ट्रेनच्या समोर उडी मारली आहे’, मृत्यूला आलिंगन देण्यापूर्वी घनश्याम बुनकर याने आपल्या मोठ्या भावाला व्हॉट्सअपवर हा संदेश पाठवला होता. परंतू त्याच्या भावाने हा मॅसेज वाचेपर्यंत सगळं काही संपले होते. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.हरमाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांगल सिरस मध्ये रविवारी ही दुर्दैवी घटना घडली. करवॉं चौथच्या दिवशी पती घरी उशीरा आल्याने घनश्याम ( 38 ) याची पत्नी ( 35 ) त्याच्यावर प्रचंड संतापली. त्यानंतर शब्दाला शब्द वाढत जाऊन दोघा पती – पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर मोनिका तावातावाने घरातून संतापाने बाहेर पडली.तिच्या पाटी घनश्याम तिला थांबविण्यासाठी तोही निघाला. परंतू काही समजायच्या आत मोनिका हीने धावत्या ट्रेन खाली उडी मारली.
मोनिकाच्या हीच्या शरीराचे तुकडे झाले.हे पाहून घनश्याम घरी आला त्याने आपल्या भावाला व्हॉट्सअपवर संदेश पाठविला, त्यात त्याने लिहीले की ‘भाई में हार गया, सॉरी! गणपतजी आणि घनश्याम कंडेल यांच्याशी बोलून घे ते तुझी मदत करतील. माझ्या आयडीवर तुला आता काम करावे लागेल. माझ्या पत्नीने ट्रेनखाली उडी मारली आहे’. हा मॅसेज वाचेपर्यंत सर्व खेळ संपला होता,घनश्याम याने पत्नीच्या साडीचा गळफास बनवून जीवन संपवले होते. पती आणि पत्नीने अशा प्रकारे जीवन संपवल्याची सूचना मिळाल्यानंतर हरमाडा ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेहांना पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहे.
पोलीसांचे काय म्हणणे ?
हरमाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी उदयभान यादव यांनी सांगितले की घनश्याम आणि मोनिका यांनी रविवारी रात्री सुसाईड केली. करवॉं चौथचा सण साजरा करण्यासाठी उशीरा पोहचल्याने दोघांमध्ये भांडण झाले. रात्री 12.30 मोनिका घरातून रागाने बाहेर पडली. तिने जयराम ब्रिजजवळ रेल्वेगाडीच्या समोर उडी मारली. त्यानंतर रात्री 2 वाजता घनश्याम देखील गळफास घेतला. मयत घनश्याम याच्या भावाच्या शेजारी चार ओळीची सुसाईट नोट्स देखील सापडली आहे. घनश्याम हा नेटवर्क मार्केटींग कंपनीत काम करीत होता. करवा चौथला त्याच्या पत्नीने व्रत ठेवले होते. परंतू तो घरी उशीरा पोहचल्याने दोघांत भांडण झाले.