Duologue NXT: ही महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देणारी चळवळ, टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांचे विधान

टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे ड्युओलॉग एनएक्सटी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमात बरुण दास हे यशस्वी महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकत आहेत.

Duologue NXT: ही महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देणारी चळवळ, टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांचे विधान
Duologue with Barun Das
| Updated on: Sep 22, 2025 | 10:35 PM

टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे ड्युओलॉग एनएक्सटी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमात बरुण दास हे यशस्वी महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकत आहेत. यात या महिला सध्याच्या टप्प्यावर कशा पोहोचल्या? त्यांच्या यामागील गुपित काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. बरुण दास यांनी या शोबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

‘ड्युओलॉग विथ बरुण दास’ या शोच्या तिसऱ्या पर्वात शो स्वतःलासाठी एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे ड्युओलॉग एनएक्सटी या शोच्या माध्यमातून अनेक महिलांची ओळख जगासमोर आणत आहेत. हा शो महिलांच्या नेतृत्वाखालील विकास कथांवर लक्ष केंद्रित करत आहे. खासकरून SHE इकॉनॉमी चळवळीला यामुळे गती मिळताना दिसत आहे. या शोचे उद्दिष्ट आहे की, यशस्वी महिलांच्या कथा जास्तीत-जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे.

या शोमध्ये होणारे संभाषण हे खेळीमेळीच्या वातावरणातीस आहे. त्यामुळे पाहुण्या यशस्वी महिलेलाही आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यात पुरेसा वेळ मिळतो. हा शो सभोवतालच्या जगाला चांगले बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या प्रवासाचे रेखाचित्र रेखाटतो. याच सहभागी झालेल्या महिला त्यांना आलेले अनुभव सांगत असतात. आज प्रगतीच्या मार्गावर असलेल्या महिलांचा उत्सव साजरा करणे अत्यावश्यक आहे आणि ड्युओलॉग एनएक्सटी हा बदल घडवून आणणाऱ्यांचा शोध घेण्यास आणि प्रसारित करण्यास सक्षम आहे.

टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी या शोबाबत सांगितले की, “बदलाच्या आघाडीवर महिला असायला हव्यात. माझ्या संपूर्ण प्रवासात, मला अशा उल्लेखनीय महिला यशस्वी महिलांना भेटण्याचा मान मिळाला आहे ज्यांच्या कथा जगासोबत शेअर करायला हव्यात. त्यांचा आवाज वाढवून, आम्ही केवळ लाखो महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही अडथळे तोडून अधिक उंची गाठण्यासाठी प्रेरित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘ड्युओलॉग एनएक्सटी’ हा शो संवादापेक्षा जास्त आहे; ही महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देणारी चळवळ आहे आणि मला या परिवर्तनकारी उपक्रमाचा भाग असल्याचा अभिमान आहे.”