AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ED Raid: जनसंघापासून भाजपसोबत असलेल्या नेत्याच्या घरी ईडीची छापेमारी, काय-काय मिळाले

ED Raid At BJP Leader: नीतीसेन भाटिया हरियाणा भाजपमधील वरिष्ठ नेते आहेत. फाळणीनंतर ते पाकिस्तानातून भारतात आले. त्यानंतर जनसंघासोबत काम करु लागले. 1987 मध्ये पानीपत नगरपालिकेचे नगराध्यक्ष ते झाले. त्यांनी विधानसभा निवडणुकही लढवली होती.

ED Raid: जनसंघापासून भाजपसोबत असलेल्या नेत्याच्या घरी ईडीची छापेमारी, काय-काय मिळाले
भाजप नेत्याकडे ईडीची छापेमारी
| Updated on: Feb 15, 2025 | 3:16 PM
Share

ED Raid At BJP Leader: भारतीय जनता पक्षाच्या सर्वात जुन्या नेत्याच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली. 17 तास ही छापेमारी सुरु होती. त्यांच्या घरी 50-60 रिकामे डब्बे, विदेशी दारु, लग्झरी गाड्या मिळाल्या. हरियाणामधील पनीपत येथील भाजप नेता नीतीसेन भाटिया यांच्या घरी ही छापेमारी झाली. नीतीसेन भाटिया 85 वर्षांचे असून जनसंघ असल्यापासून ते पक्षात आहे. भाजपचे हरियानातील ज्येष्ठ नेते ते आहेत. पक्षाच्या मार्गदर्शन मंडळात ते आहेत. त्यांचा पुतण्या संजय भाटिया मागील लोकसभा निवडणुकीत करनाल लोकसभा मतदार संघातून निवडून आला होता. भाजप नेत्याकडे ईडीची रेड पडल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.

पानीपतचे वरिष्ठ भाजप नेता नीतीसेन भाटिया यांच्या घरी ईडीची छापेमारी 17 तास चालली. जम्मू-काश्मीरमध्ये कोडीने बेस सिरप विक्री प्रकरणात ही कारवाई झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात नीतीसेन यांचा मोठा मुलगा नीरज भाटिया यांना यापूर्वी अटक झाली होती.

कोण आहे नीतीसेन भाटिया

नीतीसेन भाटिया हरियाणा भाजपमधील वरिष्ठ नेते आहेत. फाळणीनंतर ते पाकिस्तानातून भारतात आले. त्यानंतर जनसंघासोबत काम करु लागले. 1987 मध्ये पानीपत नगरपालिकेचे नगराध्यक्ष ते झाले. त्यांनी विधानसभा निवडणुकही लढवली होती. 85 वर्षीय नीतीसेन भाटिया पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात आहे. 1995 ते 2001 दरम्यान ते पक्षाचे संघटन मंत्री होते. भाजपचे जिल्हाध्यक्षही ते राहिले आहेत.

काय आहे सिरप प्रकरण

जम्मू-काश्मीर एनसीबीने गेल्या वर्षी कोडीन सिरप पकडले होते. एनसीबी पथकाने 33.980 किलो कोडीन आधारित कफ सिरप, 900 अल्प्रोझोलमच्या गोळ्या, ट्रॅमेटोलच्या 56 कॅप्सूल, लोराझेपामच्या 210 गोळ्या, क्लोबाझमच्या 570 गोळ्या आणि सुमारे 15 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. नीरज भाटिया यांच्या प्रसिद्ध आरोग्य सेवा कंपनीने नियमांचे उल्लंघन करून जम्मूमध्ये तीन लाख कोडीन आधारित सिरप आणि बनावट कंपनीच्या नावाने 12 लाख बाटल्यांचा पुरवठा केला होता. नीरज भाटिया याच्या अटकेनंतर 3.65 कोटी रुपयांची त्याची जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.