AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ED कडून गूगल अन् मेटाला चौकशीसाठी बोलवले? काय आहे प्रकरण?

गुगल आणि मेटाने ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपच्या प्रसार आणि प्रचारासाठी प्लॅटफॉर्म प्रदान केले होते. त्या प्रकरणांची सध्या मनी लाँड्रिंग आणि हवाला व्यवहारांसारख्या गंभीर आर्थिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. या कंपन्यांवर या अ‍ॅपसाठी जाहिरातींचे स्लॉट दिल्याचा आरोप आहे.

ED कडून गूगल अन् मेटाला चौकशीसाठी बोलवले? काय आहे प्रकरण?
| Updated on: Jul 19, 2025 | 11:16 AM
Share

अंलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑनलाइन सट्टेबाजी अ‍ॅप प्रकरणात गूगल आणि मेटा (फेसबूक) यांना नोटीस पाठवली आहे. या दोन्ही कंपन्यांनी सट्टेबाजी करणाऱ्या अ‍ॅपला प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांच्या जाहिराती घेतल्या, असा ईडीचा आरोप आहे. दोन्ही कंपन्यांना २१ जुलै रोजी चौकशीसाठी ईडीने बोलवले आहे.

यापूर्वी अनेक सेलिब्रिटीजची झाली चौकशी

ईडीचे म्हटले आहे की, गुगल आणि मेटाने ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपच्या प्रसार आणि प्रचारासाठी प्लॅटफॉर्म प्रदान केले होते. त्या प्रकरणांची सध्या मनी लाँड्रिंग आणि हवाला व्यवहारांसारख्या गंभीर आर्थिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. या कंपन्यांवर या अ‍ॅपसाठी जाहिरातींचे स्लॉट दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्या कंपन्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. या अ‍ॅपमुळे बेकायदेशीर कारवाया देशभर पसरू लागल्या आहेत. ईडीकडून उचललेल्या या पावलावरून आता तपास व्यापक प्रमाणात केला जात असल्याचे दिसत आहे. याआधीही अनेक चित्रपट कलाकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांची बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅपला प्रोत्साहान दिल्याबद्दल चौकशी झाली आहे.

६,००० कोटी रुपयांचा घोटाळा?

महादेव अ‍ॅप घोटाळा ६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना या अ‍ॅपच्या प्रवर्तकांकडून ५०० कोटी रुपये मिळाले असल्याचा दावा ईडीने केला आहे.

२९ जणांवर गुन्हा दाखल

अंमलबजावणी संचालनालयाने प्रसिद्ध अभिनेते, टीव्ही होस्ट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसह २९ जणांविरुद्ध या प्रकरणात यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांवर बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅपला प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. ईडीच्या एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये ज्या सेलिब्रिटींची नावे नोंदवली गेली आहेत, त्यात प्रकाश राज, राणा दग्गुबती आणि विजय देवरकोंडा या सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. या अ‍ॅपच्या जाहिरातींच्या बदल्यात या लोकांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचा आरोप आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.