AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JNU म्हणजे वेळेच्या पुढे विचार करणारी प्रयोगशाळा – दीक्षांत सोहळ्यात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे उद्गार

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी JNU दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कौतुक केले. "वेळेच्या पुढे विचार करणारी प्रयोगशाळा" असं त्यांनी जेएनयूचे वर्णन केलं. तसेच विद्यापीठाचा समृद्ध वारसाची, आंतरविद्याशाखीय संशोधन आणि टीकात्मक विचारसरणीची त्यांनी प्रशंसा केली. प्रधान यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीला सामाजिक जबाबदारी मानून विकसित भारताच्या ध्येयासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

JNU म्हणजे  वेळेच्या पुढे विचार करणारी प्रयोगशाळा - दीक्षांत सोहळ्यात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे उद्गार
धर्मेंद्र प्रधान
| Updated on: Jan 12, 2026 | 3:05 PM
Share

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) नवव्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि विद्यापीठातील प्राध्यापकांसह इतर अधिकाऱ्यांना संबोधित केले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या भाषणात JNUचे कौतुक केले. जेएनयू ही अशी एक प्रयोगशाळा आहे जी त्याच्या काळाच्या खूप पुढे आहे, असं ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी शिक्षणमंत्र्यांह पराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन हेही उपस्थित होते.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, जेएनयूचा स्वतःचा समृद्ध वारसा आहे. Interdisciplinary research focus, हा जेएनयूच्या डीएनएचा एक भाग आहे. जेएनयूचे शैक्षणिक वातावरण नेतृत्व विकासाचे एक शक्तिशाली केंद्र राहिले आहे. जेएनयू आता केवळ एक संस्था राहिलेली नसून ती एक संस्कृती आहे असंही धर्मेंद्र प्रधान यांनी नमूद केलं.

यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी जेएनयूच्या काही माजी विद्यार्थ्यांबद्दलही सांगितले, ज्यात डीपी त्रिपाठी, कॉम्रेड सीताराम येचुरी, कॉम्रेड प्रकाश आणि सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा त्यांनी उल्लेख केला. त्यांचे चांगले मित्र आणि विद्यमान संसद सदस्य डॉ. जॉन बिट्रोस यांच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांनी सार्वजनिक जीवनात एक ठसा उमटवल्याचंही त्यांनी नमूद केलं.

क्रिटिकल थिंकीग हा जेएनयूचा आत्मा

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जेएनयूचे कौतुक केले आणि म्हणाले की, क्रिटिकल थिंकीग हे जेएनयूच्या आत्म्यात आहे. जेएनयूमध्ये वादविवाद, चर्चा, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि बौद्धिक देवाणघेवाणीची एक जिवंत संस्कृती आहे. जेएनयू हे एक बौद्धिक केंद्र राहिलं आहे जिथे विचार परखले जातात आणि विकास केला जातो, जे नंतर राष्ट्रीय धोरणांमध्ये योगदान देतात असं ते म्हणाले.

तुमच्यापैकी काहींनी संसद आणि विधानसभेत पोहोचून लोकशाही मजबूत करावी, काहींनी कर्तव्य भवनात देशसेवेची जबाबदारी पार पाडावी, काहींनी धोरणात्मक तज्ञ आणि राजदूत म्हणून भारताची जागतिक भूमिका मजबूत करावी असंही शिक्षण मंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये विद्यार्थ्यांबद्दल लिहीलं. काहींनी नवोन्मेष आणि उद्योजकतेद्वारे स्टार्ट-अप्स आणि युनिकॉर्नचा पाया रचला पाहिजे आणि काहींनी लेखक, पत्रकार आणि समाजाचे विचारवंत बनून राष्ट्राच्या वैचारिक प्रवचनाला दिशा दिली पाहिजे असंही त्यांनी त्यात नमूद केलं.

पदवी मिळवणं ही केवळ वैयक्तिक कामगिरी नाही

पुढे शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं की, जेएनयूमधून पदवी मिळवणं ही केवळ वैयक्तिक कामगिरी नाही तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. JNUची समावेशकता, सामाजिक न्याय आणि जबाबदारीची परंपरा पुढे नेऊन, येथील विद्यार्थी विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असा मला विश्वास आहे.सर्व पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरी करण्याची समान संधी देऊन जेएनयूने एक आदर्श निर्माण केला आहे असंहीते पुढे म्हणाले.

'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा.
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा.
....तरच नवऱ्याला जेवण द्या, पंकजा मुंडे यांचे मतदारांना अनोखे आवाहन
....तरच नवऱ्याला जेवण द्या, पंकजा मुंडे यांचे मतदारांना अनोखे आवाहन.