दोन राज्यात बॅलेट पेपरवर निवडणूक, काँग्रेसला थेट…, धक्कादायक निकाल, भाजपचं काय झालं?
मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसकडून सातत्याने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी सुरू असतानाच दोन राज्यात बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या आहेत. या राज्यात धक्कादायक निकाल समोर आला आहे.

काँग्रेससह विरोधी पक्षांकडून वारंवार ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून मतचोरी होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सुरू आहे. ईव्हीएमऐवजी मतदान बॅलेट पेपरवर घ्यावं अशी विरोधकांची प्रमुख मागणी आहे. दुसरीकडे सध्या देशातील विविध राज्यांमध्ये निवडणूक आयोगाकडून एसआयआरची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान एसआयआरला देखील विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द करावी अशी मागणी विरोधकांकडून सुरू आहे. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली आहे. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून विरोधक राजधानी दिल्लीमध्ये जोरदार आंदोलन करत आहेत. दरम्यान एकीकडे दिल्लीमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू असतानाच आता दुसरीकडे मात्र मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे निवडणुका या बॅलेट पेपरवरच घ्या, अशी मागणी करणाऱ्या काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
दोन राज्यांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात आल्या आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे, तर भाजपला दणदणीत यश मिळालं आहे. दोन्ही राज्यांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या होत्या, मात्र या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. त्रिपुरामध्ये नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत, या निवडणुकीत एनडीएला मोठं यश मिळालं आहे. त्रिपुरा निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीमध्ये त्रिपुरामध्ये एनडीएचा घटक पक्ष असलेल्या टिपटा मोथा पार्टी (TMP) पक्ष हा सर्वात मोठा ठरला आहे. या निवडणुकीमध्ये जवळपास 74.30 टक्के जागा या एकट्या पार्टीला मिळाल्या आहेत. तर भाजप हा दुसरा क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला 859 जागा मिळाल्या आहेत.
या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 33 जागाच मिळाल्या आहेत. तर सीपीआय एमला 87 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुका बॅलेट पेपरवर होऊन देखील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे आसाममध्ये महापालिकेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये 42 जागांपैकी 32 जागा या भाजपला मिळाल्या आहेत तर काँग्रेसला अवघ्या 6 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.