Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू यांच्या गावात अजूनही पोहोचली नाही वीज; राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा होताच सरकारकडून दखल

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपतीपदासाठी होताच त्यांच्या नावाची चर्चा देशभर सुरू झाली आहे. मात्र अजूनही त्यांचे गाव विजेपासून वंचित आहे.

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू यांच्या गावात अजूनही पोहोचली नाही वीज; राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा होताच सरकारकडून दखल
द्रौपदी मुर्मूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 1:08 PM

नवी दिल्ली : एनडीएच्या (NDA) वतीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार (Presidential candidate) म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपतीपदासाठी होताच त्यांच्या नावाची चर्चा देशभर सुरू झाली आहे. मात्र याचदरम्यान द्रौपदी मुर्मू यांच्या गावाचे व्यथीत करणारे भीषण वास्तव्य देखील समोर आले आहे. मुर्मू यांचा ज्या गावात जन्म झाला, त्या डूंगरीशाही गावात देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, मात्र अद्यापही वीज (Electricity)पोहोचू शकलेली नाही. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील ऊपरबेडा गावात झाला. या गावाची लोकसंख्या अवघी 3500 इतकी आहे. या गावात दोन वाड्या आहेत. एक बडाशाही आणि दुसरी डुंगरीशाही यापैकी बडाशाहीमध्ये तर वीजेची व्यवस्था आहे. मात्र अद्यापही डुंगरीशाहीमध्ये वीज पोहोचू शकलेली नाही. वीज नसल्याने येथील नागरिक रात्रीच्या उजेडासाठी रॉकेलच्या दिव्याचा उपयोग करतात. तर मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट करावी लागते.

21 कुटुंबांचे वास्तव्य

एनडीएच्या वतीने राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा होताच त्यांचे गाव डूंगरीशाही देखील चर्चेत आले आहे. या गावात जेव्हा पत्रकार पोहोचले तेव्हा या गावात वीजच नसल्याचे समोर आले. त्यानंतर या गावाची बरीच चर्चा झाली. ओडीशा सरकारने तातडीने याची दखल घेत गावात विजेची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारकडून आता या गावात विजेचे पोल आणि डीपी उभारण्याचे काम सुरू आहे. याच गावात द्रौपदी मुर्मू यांच्या दिवंगत भावाचा मुलगा बिरंची नारायण टुडू यांच्या कुटुंबासह अन्य 20 कुटुंबे राहातात. आतापर्यंत गावात वीज नव्हती. त्यामुळे हे सर्व जन रॉकेलचा उपयोग करूनच रात्रीच्या अंधारात प्रकाशाची व्यवस्था करतात. तसेच मोबाई चार्जिंग करण्यासाठी या लोकांना जवळपास एक ते दोन किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. मात्र आता राज्य सरकारने दखल घेतल्यामुळे या गावाचा अंधकार दूर होणार आहे.

हे सुद्धा वाचा

द्रौपदी मुर्मू यांचा अभिमान

येथील नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला द्रौपदी मुर्मू यांचा अभिमान वाटतो. आमच्या गावातील मुलगी ही राष्ट्रपतीपदाची उमेदवार आहे. ती लवकरच राष्ट्रपती देखील होईल. मात्र वाईट या गोष्टीचे वाटते की अद्यापही आमच्या गावात वीज पोहोचू शकली नाही. आम्हाला फोन चार्जिंग तसेच इतर कामांसाठी दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. रॉकेच्या मदतीनेच आम्ही रात्री घरात प्रकाश करतो. मात्र आता लवकरच गावात वीज पोहोचले अशी अशा वाटते.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.