Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौदर्यांसाठी 79 रुपयांची घेतली क्रीम, पण त्वचेचा रंग उजळला नाही…बड्या कंपनीला कोर्टाचा 15 लाखांचा दंड

Emami Ltd: कंपनीने आपल्या उत्पादनांच्या संदर्भात अनुचित व्यापार पद्धती थांबवाव्यात, पॅकेजेस, लेबले, जाहिराती त्याच्या ब्रँड ॲम्बेसेडर किंवा इतरांकडून करण्यात येणारे दावे मागे घ्याव्यात. तसेच माध्यमांद्वारे माहिती पुन्हा सादर करावी आणि 14.50 लाख रुपये नुकसान भरपाई तक्रारदारास द्यावी.

सौदर्यांसाठी 79 रुपयांची घेतली क्रीम, पण त्वचेचा रंग उजळला नाही...बड्या कंपनीला कोर्टाचा 15 लाखांचा दंड
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 2:56 PM

Emami Ltd: वेगवेगळ्या जाहिरातीला बळी पडून उत्पादनाची खरेदी केली जाते. मग उत्पादनाचा वापर सुरु केल्यावर दावा फोल ठरतो. हा अनुभव अनेक ग्राहकांना येत असतो. दावा फोल ठरवल्यावर एका ग्राहकाने बड्या मल्टीनॅशनल कंपनीला कोर्टात खेचले. त्यानंतर कोर्टाने त्या कंपनीला 15 लाखांचा दंड केला. इंडियन मल्टीनॅशनल कंपनी इमामी लिमिटेडला हा दंड मध्य प्रदेशातील ग्राहक मंचाने केला आहे.

मध्य दिल्ली प्रदेशातील जिल्हा ग्राहक मंचात फेअर अँड हँडसम क्रिमविरोधात दावा दाखल करण्यात आला. कंपनीने जाहिरातीच्या माध्यमातून चुकीचे आणि फसवणूक करणारे दावे केले, असा आरोप करण्यात आला. त्यांनी 2013 मध्ये 79 रुपयांना कंपनीची क्रिम खरेदी केली. परंतु कंपनीच्या दाव्यानुसार त्यांची त्वचा उजळली नाही. यामुळे त्यांनी ग्राहक मंचात दावा दाखल केला.

अशी झाली सुनावणी

ग्राहक मंचाचे अध्यक्ष इंदर जीत सिंह आणि सदस्य रश्मी बन्सल यांच्यापुढे या दाव्याची सुनावणी झाली. त्यात तक्रारदाराने दावा केला की, प्रॉडक्टवर दिलेल्या सूचनांप्रमाणे नियमित क्रिमचा वापर केला. त्यानंतर त्वचा उजळली नाही. चेहरा आणि गळ्यावर क्रिम लावली. परंतु गोरा झालो नाही. तक्रारदाराच्या या दाव्यावर इमामी लिमिटेडने म्हटले की, आम्ही दिलेल्या सूचनांप्रमाणे क्रिमचा वापर केला गेला, हे सिद्ध करण्यात तक्रारदारास अपयश आले. रिकॉर्डमध्ये असे काहीच नाही, त्यातून सिद्ध होईल की, क्रिम वापल्यानंतर त्वचा गोरी झाली नाही का?

हे सुद्धा वाचा

असे दिले आदेश

ग्राहक मंचाने म्हटले की, पॉडक्टच्या पॅकेजिंग आणि लेबलिंगवर प्रॉडक्टच्या अटीसंदर्भात लिहिले गेले नाही. जे लिहिले आहे, त्यानुसार हे प्रॉडक्ट 16 ते 35 वर्षांचा युवा आणि पुरुषांसाठी आहे. त्यासंदर्भात विस्तृत लिहिले गेले नाही. यामुळे तक्रारदारास दोषी धरता येत नाही. कंपनीला माहिती होते की, दिलेल्या सूचना अपूर्ण आहे.

चुकीच्या जाहिराती आणि ग्राहकांसोबत अनुचित व्यवहार प्रॉडक्टची विक्री वाढवण्यासाठी करण्यात आला. मंचाने आदेश देताना म्हटले की, कंपनीने आपल्या उत्पादनांच्या संदर्भात अनुचित व्यापार पद्धती थांबवाव्यात, पॅकेजेस, लेबले, जाहिराती त्याच्या ब्रँड ॲम्बेसेडर किंवा इतरांकडून करण्यात येणारे दावे मागे घ्याव्यात. तसेच माध्यमांद्वारे माहिती पुन्हा सादर करावी आणि 14.50 लाख रुपये नुकसान भरपाई तक्रारदारास द्यावी.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.