AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBI Director appointment | महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक राहिलेले सुबोध कुमार जयस्वाल सीबीआयचे नवे संचालक

माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार यांची सीबीआयच्या प्रमुखपदी निवड झालीय.

CBI Director appointment | महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक राहिलेले सुबोध कुमार जयस्वाल सीबीआयचे नवे संचालक
सुबोधकुमार जयस्वाल, सीबीआय, संचालक
| Updated on: May 26, 2021 | 12:16 AM
Share

नवी दिल्ली : माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार यांची सीबीआयच्या प्रमुखपदी निवड झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या बैठकीनंतर जयस्वाल यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अखेर सीबीआय संचालकपदी त्यांचीच नियुक्ती झालीय. (Ex Maharashtra DGP Subodh Kumar Jaiswal appointed as CBI Chief).

1985 च्या बॅचमधील जयस्वाल यांची 2 वर्षांसाठी सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती झालीय. पदभार स्वीकारल्यापासून ही 2 वर्षांची मुदत असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी सीबीआय संचालकाच्या स्पर्धेतील 2 नावांवर फुली मारली आहे. त्यामुळे या पदावर जयस्वाल यांची वर्णी लागण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती. (Subodh Kumar Jaiswal will be new CBI chief?)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत बैठक घेतली होती. सीबीआयच्या संचालक निवडीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. तब्बल 90 मिनिटे ही मिटिंग चालली. यावेळी रमन्ना यांनी एका महत्त्वाच्या नियमाचा हवाला देऊन या स्पर्धेतील दोन नावांवर फुली मारली होती.

म्हणून दोन नावे बाद

रमन्ना यांनी 6 मंथ नियमाचा यावेळी हवाला दिला. सीबीआयच्या नव्या संचालकाच्या नियुक्तीमध्ये सहा महिन्याच्या नियमांचं पालन झालं पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांच्या निवृत्तीला केवळ सहा महिने बाकी आहेत, त्यांचाच या पोस्टसाठी विचार केला जावा, असं नियम सांगतो, असं रमन्ना यांनी सांगितलं. सरन्यायाधीशांच्या या वक्तव्याचं अधीर रंजन यांनी समर्थन केलं. तीन सदस्यांच्या पॅनलमधील दोन सदस्यांनी या नियमाची बाजू घेतली. त्यामुळे सीबीआय संचालकपदाच्या स्पर्धेतील दोन नावे बाद झाली.

कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?

  • सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
  • त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ RAW मध्ये काम केलं आहे.
  • RAW मध्ये त्यांनी 9 वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली
  • सुबोध जयस्वाल यांच्याकडे तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास सोपवण्यात आला होता
  • सुबोधकुमार हे 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात सहभागी होते.
  • मुंबई पोलीस दलात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे.
  • जुलै 2018 मध्ये सुबोधकुमार यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली.

निवड कशी होते?

सीबीआयच्या संचालकाची पोस्ट फेब्रुवारीपासून रिक्त आहे. ऋषी कुमार शुक्ल हे फेब्रुवारीपर्यंत संचालक म्हणून काम पाहत होते. त्यानंतर प्रवीण सिन्हा यांच्याकडे या विभागाचा प्रभारी चार्ज दिला. या पोस्टसाठी 1984 ते 1987 च्या बॅचच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार केला जातो. सेवा जेष्ठता, प्रामाणिकपणा, भ्रष्टाचाराच्या केसेस हाताळण्याचा अनुभव आदी गोष्टी पाहून निवड समिती सीबीआयच्या संचालकाची निवड करते. (Subodh Kumar Jaiswal will be new CBI chief?)

हेही वाचा :

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सीबीआयचे डायरेक्टर होणार?; सरन्यायाधीशांच्या भूमिकेनं दोन नावं बाद!

माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार

तणावाच्या स्थितीत महाराष्ट्राला नवा पोलीस महासंचालक मिळाला!

व्हिडीओ पाहा :

Ex Maharashtra DGP Subodh Kumar Jaiswal appointed as CBI Chief

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.