AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रायपूर विमानतळावरील एका बांग्लादेशी विमानाचे थकलेले पार्किंग भाडे 2.25 कोटी, पार्किंग भाड्यासाठी आता होणार विमानाचा लिलाव, 7 वर्षांपूर्वी झाले होते लँडिंग

या विमानाची किंमत एकूण 180 कोटी आहे, तर गेल्या सात वर्षांपासूनचे पार्किंग चार्जेस हे 2.25 कोटी रुपये इतके आहेत. वारंवार बांग्लादेशशी संपर्क करुनही हे विमान अजूनही रायपूरवरुन बांग्लादेशात नेण्यात आलेले नाही. त्यामुळे अखेरीस या विमानाचा लिलाव करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

रायपूर विमानतळावरील एका बांग्लादेशी विमानाचे थकलेले पार्किंग भाडे 2.25 कोटी, पार्किंग भाड्यासाठी आता होणार विमानाचा लिलाव, 7 वर्षांपूर्वी झाले होते लँडिंग
Bangladesh plane in RaipurImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 10, 2022 | 8:18 PM
Share

रायपूर – बांग्लादेशचे एक विमान (Bangladeshi plane)गेल्या सात वर्षांपासून रायपूरच्या विमानतळावर (Raipur Airport)उभे आहे. ढाक्यावरुन मस्कतला जात असलेल्या या विमानाचे सात वर्षांपूर्वी रायपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात (emergency landing)आले होते. विमानतळाचे संचालक तीनदा बदलले तरीही हे विमान अजून रायपूरवरुन बांग्लादेशला रवाना होऊ शकलेले नाही. या विमानाची किंमत एकूण १८० कोटी आहे, तर गेल्या सात वर्षांपासूनचे पार्किंग चार्जेस हे २.२५ कोटी रुपये इतके आहेत. वारंवार बांग्लादेशशी संपर्क करुनही हे विमान अजूनही रायपूरवरुन बांग्लादेशात नेण्यात आलेले नाही. त्यामुळे अखेरीस या विमानाचा लिलाव करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

विमान विकून पार्किंगचे पैसे वसूल करणार

या विमानाच्या पार्किंगच्या भाड्याबाबत थेट परराष्ट्र मंत्रालय पाठपुरावा करते आहे. २ डझनांहून अधिक ई मेल्स पाठवल्यानंतर आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या दबावानंतर, परदेशी एयरलाईन्सने विमान विकून पार्किंगचे पैसे फेडू असे आश्वासन दिले आहे. रायपूर एयरपोर्ट प्रशासनाला विमान विकल्यानंतर पार्किंगचे पैसे आणि इतर शुल्क देण्यात येणार आहे. या विमानाच्या विक्रीसाठी आता लवकरच ऑनलाईन जगतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यानंतर विकत घेणारे हे विमान रायपूरवरुन नेणार आहेत.

२०१५ पासून विमान उभे

७ ऑगस्ट २०१५ साली ढाक्यावरुन मस्कतला हे विमान चालले होते. त्यावेळी विमानाचे इंजिन फेल झाले. यात १७३ प्रवासी होते. रायपूरपासून ९० किलोमीटरवर बेमेतरा येथे इंजिनच्या एका भागाला आग लागलून तो भाग शेतांमध्ये पडला. त्यानंतर पायलटने रायपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी मागितली. तेव्हापासून हे विमान रायपूर विमानतळावरच उभे आहे. या विमनाचे इंजिनही बदलण्यात आले आहे. इतके करुनही विमान माघारी नेण्यात आलेले नाही. विमानतळ प्रशासनाकडून सातत्याने आठवणेची मेल पाठवण्यात येत होते, मात्र त्यांना कोणतेही उत्तर मिळत नव्हते. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला. तेव्हा संबंधित विमान कंपनीने विमान विकून पैसे फेडण्याचे आश्वासन दिले आहे.

२.२५ कोटींहून अधिक पार्किंग शुल्क

बांग्लादेशातील युनायटेड एयरवेज कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर कंपनीने विमान विकत असल्याची माहिती दिली आहे. गेल्या सात वर्षांत या विमानाच्या पार्किंगसह इतर शुल्क धरुन २.२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. बाजारात या नव्या विमानाची किंमत १८० कोटींहून अधिक आहे. त्यामुळे अर्ध्याहून अधिक किमतीत हे विकले जाईल, अशी शक्यता आहे. विमान विकल्यानंतरच रायपूर विमानतळाला पार्किंग शुल्क मिळणार आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.