Explainer: फटाके सर्वात आधी कुठे फोडल्या गेले? मग भारतात आले कसे? जाणून घ्या आतषबाजीचा दणकेबाज इतिहास
Fireworks History 'दिवाळ सण मोठा, नाही आनंदाला तोटा' असं म्हणत सध्या सगळीकडं धामधूम सुरू आहे. दिवाळीचा उत्साह भारतात नाही तर जगभरात दिसून येतो. दिव्यांचे पर्व असलेल्या या सणात फटक्यांची आतषबाजी हा चर्चेचा विषय असतो.

History of Fireworks : भारतात दिवाळीची धामधूम सुरू आहे. जगभरात दिवाळीचे आकर्षण आहे. तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या या प्रकाशपर्वात फटक्यांनी कित्येक वर्षांपूर्वी घुसखोरी केली आणि या आनंदपर्वाला चारचांद लागले. परंपरेला आतषबाजीचे नभोमंडळातील तोरण लागले. विविध फटक्यांचे प्रकार आले. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर फटाके फोडण्याची परंपरा काल सर्व देशभरात जपली गेली. फटक्यांचे तुफान आले. त्यामुळे प्रदूषण झाले. अनेक शहरातीलच नाही तर गावातील हवेची गुणवत्ता दुषीत झाली. त्याच्या आज हेडलाईन्स झळकतीलच. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फटक्यांच्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली आहे. पण हे फटाके सर्वात आधी कुठे फोडल्या गेले हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात फटाके कोणत्या मार्गाने आलेत, या आतषबाजीचा दणकेबाज इतिहास तुम्हाला माहिती आहे का? ...
