Fact Check | मिया खलिफाच्या पोस्टरला काँग्रेस कार्यकर्ते केक भरवतानाचा फोटो व्हायरल, खरं काय?

मिया खलिफाच्या पोस्टरला काँग्रेस कार्यकर्ते केक खाऊ घालत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. Congress workers offering cake to Mia Khalifa poster photo

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:38 PM, 8 Feb 2021
Fact Check | मिया खलिफाच्या पोस्टरला काँग्रेस कार्यकर्ते केक भरवतानाचा फोटो व्हायरल, खरं काय?
मिया खलिफाच्या फोटोला काँग्रेस कार्यकर्ते केक भरवत असल्याचा दावा करण्यात आलाय

नवी दिल्ली : अमेरिकन मॉडेल आणि माजी पॉर्नस्टार मिया खलिफा (Mia Khalifa) सातत्याने भारतातील शेतकऱ्यांना (Indian Farmers) पाठिंबा देत ट्विट करत आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याने ज्या पद्धतीने मिया खलिफाचं कौतुक झालं, तसंच काही प्रमाणात तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. आता मिया खलिफाच्या पोस्टरला काँग्रेस कार्यकर्ते केक खाऊ घालत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. पण, काँग्रेस कार्यकर्त्यांनी खरच असं केलयं का? की त्या फोटोमागे आणखी काय सत्य दडलंय. (Fact Check Congress workers offering cake to Mia Khalifa poster photo viral but what is truth of Photo)

मिया खलिफाच्या फोटोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केक भरवला

मिया खलिफानं ट्विट आणि इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर तिच्या समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन घटकांमध्ये सोशल मीडिया विभागला गेला. ट्विटर वापरकर्ते चौधरी ईश्वर सिंह रोड यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते मिया खलिफाला केक भरवताना दिसले. त्यांनी यामध्ये काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला टॅग देखील केलं आहे. या फोटोची पडताळणी केलं असता वेगळंचं सत्य समोर आलं.

चौधरी ईश्वर सिंह यांनी शेअर केलेला फोटो मॉर्फ केला असल्याचं दिसून आलं. काँग्रेस कार्यकर्ते मिया खलिफाला केक भरवतानाचा फोटो शेअर कर आहेत तो मॉर्फ केला असून मूळ फोटो मध्ये काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या फोटोला केक भरतवत आहेत. काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करत होते. मात्र त्या फोटोला मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आलं.

फोटो मागचं सत्य

rahul gandhi

खरा फोटो

मिया खलिफाकडून शेतकरी आंदोलनाला समर्थन

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मिया खलिफाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मात्र, मियाने ट्रोल्सला सडेतोड उत्तर दिलं. आता मिया खलिफाने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात तिने अनोख्या पद्धतीने शेतकऱ्याचे आभार मानत पुन्हा शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय

मिया खलिफाच्या या नव्या व्हिडीओत ती भारतीय पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. यात समोसा आणि गुलाम जामुनचा समावेश आहे. हे पदार्थ खाताना मियाने शेतकऱ्यांचाही उल्लेख केला, तसेच ते जेवण पाठवणाऱ्यांचे आभार मानले. मिया खलिफा या व्हिडीओत म्हणाली, “खूप कष्ट करणे आणि त्यानंतर काही तरी मिळवणे ही भावना खूप चांगली आहे. जसं की मला आज हे स्वादिष्ट जेवण मिळालंय. माणुसकीच्या नात्याने सोशल मीडियावर मी शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याने मला हे जेवण मिळालंय. त्याबद्दल मी रुपी कौर यांचे आभार मानते. याशिवाय या अप्रतिम गुलाम जामुनसाठी जगमीत यांचेही आभार” मानले आहेत.

संबंधित बातम्या :

सकाळी पॉपस्टार, आता पॉर्नस्टार, मिया खलिफा शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे मिया?

देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात स्वस्त, दिल्ल्लीच्या दिव्याखाली अंधार; संजय राऊतांचा घणाघात

Fact Check Congress workers offering cake to Mia Khalifa poster photo viral but what is truth of Photo