AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check : शाहीन बागेत पिस्तूल ताणणाऱ्या कपिल गुर्जरने भाजपात प्रवेश केला?

कपिल गुर्जरने भाजपात प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल झाला (Fact Check is Prakash Gurjar shoot on shaheen bagh protesters)

Fact Check : शाहीन बागेत पिस्तूल ताणणाऱ्या कपिल गुर्जरने भाजपात प्रवेश केला?
| Updated on: Jan 01, 2021 | 7:27 PM
Share

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीच्या शाहीन बागेत आंदोलन सुरु असताना हवेत गोळीबार करणारा तरुण कपिल गुर्जरने 30 डिसेंबरला भाजपात प्रवेश केला. मात्र, कपिलच्या या भाजप प्रवेशावरुन सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ माजला. अनेकांनी भाजपवर सडकून टीका केली. अखेर याप्रकरणावरुन भाजपला नमतं घेत तडकाफडकी कपिल गुर्जरचं सदस्यत्व रद्द करावं लागलं (Fact Check is Prakash Gurjar shoot on shaheen bagh protesters).

या सर्व घडामोडींनंतर आता सोशल मीडियावर नेमका कुणाचा फोटो व्हायरल झाला ज्यावरुन भाजपवर निशाणा साधला गेला? कपिल गुर्जरने आंदोलनकर्त्यांवर खरच गोळी झाडली होती का? याबाबतची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Fact Check is Prakash Gurjar shoot on shaheen bagh protesters).

कपिल गुर्जरने भाजपात प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल झाला. या फोटोत एक तरुण हातात बंदूक घेऊन कुणावरतरी गोळी झाडण्याच्या इराद्यात दिसत आहे. तर त्याच फोटोच्या दुसऱ्या बाजूला कपिल गुर्जरच्या भाजप पक्षप्रवेशातील फोटो जोडण्यात आला आहे. या फोटोत ज्या तरुणाच्या हातात बंदूक आहे तो कपिल गुर्जरच असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. त्याच फोटोवरुन भाजपवर सडकून टीका करण्यात आली. त्यानंतर अखेर भाजपने तातडीने कपिलचं भाजप सदस्यत्व रद्द केलं.

भाजपची भूमिका काय?

कपिलची भाजपातून हकालपट्टी केल्यानंतर भाजपचे उत्तर प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. “गाझियाबादच्या कपिलची विचारधारा भाजपला अनुरुप नाही. त्यामुळे भाजपमधील त्याचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे”, असं स्वतंत्र देव सिंह म्हणाले. तर दुसरीकडे भाजप नेते संजीव शर्मा यांनी कपिल गुर्जरचं शाहीन बाग प्रकरण आम्हाला माहित नव्हतं असं सांगत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

खरं-खोटं काय?

भाजपच्या या भूमिकेनंतरही सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो खरच कपिल गुर्जरचा आहे का? हे समोर आलं नाही. पण इंडिया टुडेच्या अँटी फेक न्यूज वॉररुमने याबाबत केलेल्या संशोधनात फोटोत बंदूक हातात घेतलेला तरुण हा कपिल गुर्जर नाही हे समोर आलं. बंदूक हातात घेतलेल्या तरुणाचं नाव रामभक्त गोपाल असं आहे. त्याने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिक यूनिव्हर्सिटी बाहेर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान गोळ्या झाडल्या होत्या.

दुसरीकडे कपिल गुर्जर यानेदेखील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीन बागेत सुरु असलेल्या आंदोलनात हवेत गोळीबार केला होता. पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा त्याने जय श्रीरामचा नारा दिला होता. याचा अर्थ कपिल गुर्जरने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान गोळीबार केला ही माहिती खरी असली तरी व्हायरल होणारा फोटो हा रामभक्त गोपालचा असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा : भाजप-ममतांची लढाई पुन्हा ‘मीर जाफर’वर का आली?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.