भाजप-ममतांची लढाई पुन्हा ‘मीर जाफर’वर का आली?

शुभेंदू अधिकारी हे टीएमसीचे वजनदार मंत्री होते. काही दिवसांपुर्वीच त्यांनी अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय.

भाजप-ममतांची लढाई पुन्हा 'मीर जाफर'वर का आली?
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 6:12 PM

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या लढाईत ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता टीएमसी सोडून भाजपात गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांच्या भावानेही टीएमसीला टाटा बाय बाय केलाय. शुभेंदू अधिकारी हे टीएमसीचे वजनदार मंत्री होते. काही दिवसांपुर्वीच त्यांनी अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. त्यानंतर आता त्यांचा भाऊ आणि कांथी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सौमेंदू अधिकारी हेही भाजपात  गेलेत. विशेष म्हणजे सौमेंदू अधिकारीसोबत 15 नगरसेवकांनीही टीएमसी सोडून भाजपचा मार्ग पत्करलाय. कांथी नगरपरिषद ही 21 सदस्यांची आहे. त्यात 15 नगरसेवक हे आता भाजपात गेल्यानं टीएमसीनं ही नगरपरिषदही गमावलीय. (tmc 15 councilors including suvendu adhikaris brother soumendu joined bjp )

सगळी सत्ताधारी पदं एकाच घरात

भाजपात गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांचा भाऊ दिव्येंदू आणि वडील शिशीर अधिकारी हे दोघेही टीएमसीचे खासदार आहेत. पश्चिम मेदिनापूर हा अधिकारी कुटुंबाचा गड मानला जातो. काही दिवसांपुर्वीच सौमेंदू अधिकारी यांना नगराध्यक्ष पदावरून टीएमसीनं हटवलं होतं. त्यानंतर ते भाजपात जाणार याची चर्चा सुरु होती. आता ऐन विधानसभेच्या रणधुमाळीत पूर्ण अधिकारी कुटुंबच भाजपात गेल्यानं ममता बॅनर्जींना झटका बसलाय.

अधिकारी म्हणजे मीर जाफर

अधिकारी कुटुंबाच्या भाजपात जाण्यावर टीएमसीनं चांगलीच टीका केलीय. जोपर्यंत पदावर होते तोपर्यंत टीएमसीत होते आणि जसंही पदावरून हटवलं तसं ते भाजपात गेले. हा प्रकार मीर जाफरसारखा असल्याचं टीएमसीनं म्हटलंय. मीर जाफरला तसही बंगालमध्ये कुणी पसंत करत नसल्याची टिप्पणीही टीएमसीनं जोडलीय.

मीर जाफर कोण होता?

मीर जाफर हा 1757 ते 1760 दरम्यान बंगालचा नवाब होता. त्या आधी तो सिराजउद्दौलाचा सरसेनापती होता. पण बंगालचा नवाब होण्यासाठी तो प्लासीच्या लढाईत ब्रिटीशांना जाऊन मिळाला. त्याच लढाईनं भारतात ब्रिटीश सत्तेचा अंमल सुरु झाला पण त्यानंतर भारतीय इतिहासात मीर जाफरला देशद्रोही, गद्दार म्हणूनच ओळखलं जातं. (tmc 15 councilors including suvendu adhikaris brother soumendu joined bjp )

संबंधित बातम्या –

भाजपचे आमदार, कृषी कायद्यावर थेट डाव्यांना साथ, नंतर का पलटी?

पंतप्रधान मोदींचे देशवासियांना न्यू इयर गिफ्ट; शहरी गरिबांना स्वस्तात घरे मिळणार

(tmc 15 councilors including suvendu adhikaris brother soumendu joined bjp )

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.