AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचे आमदार, कृषी कायद्यावर थेट डाव्यांना साथ, नंतर का पलटी?

मी केंद्रीय कायद्यांचा विरोध केला नाही, किंवा केंद्र सरकारच्या विरोधात गेलो नाही. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.” असं केरळातील एकमेव भाजप आमदार राजगोपाल म्हणाले

भाजपचे आमदार, कृषी कायद्यावर थेट डाव्यांना साथ, नंतर का पलटी?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jan 01, 2021 | 4:07 PM
Share

तिरुअनंतपुरम : वादग्रस्त कृषी कायदे (Agriculture Laws) रद्द करण्याची मागणी करणाऱ्या प्रस्तावाला समर्थन देत केरळ विधानसभेतील (Keral Vidhansabha) भाजपच्या एकमेव आमदाराने सर्वांनाच चकित केले. मात्र काही तासातच पलटी घेत आमदार ओ राजगोपाल (O Rajagopal) यांनी सदनातील प्रस्तावाला विरोध असल्याचं स्पष्ट केलं. मोदी सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन करत आहेत. (Kerala assembly resolution against farm laws BJP MLA Rajagopal retracts)

केरळ विधानसभेच्या विशेष अधिवेशनात गुरुवारी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी एक प्रस्ताव मांडला. सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ), कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) आणि भाजपच्या पाठिंब्याने तो एकमताने संमत करण्यास सुचवलं. “हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. मी या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दर्शवला. काही मुद्द्यांबाबत माझे मत (मोशनमध्ये) दिले, मतभेद असलेल्या मुद्द्यांचा मी सभागृहात उल्लेख केला” असं अधिवेशनानंतर ओ राजगोपाल यांनी पत्रकारांना सांगितलं.

पत्रकारांनी लक्ष वेधूनही राजगोपाल ठाम

या प्रस्तावात तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केल्याकडे पत्रकारांनी राजगोपाल यांचे लक्ष वेधले, तेव्हाही त्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा असल्याचं म्हटलं. राजगोपाल म्हणाले, “मी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत.” त्यांनी सभागृहाच्या सर्वसाधारण मताशी सहमत असल्याचे सांगितले. ही लोकतांत्रिक भावना असल्याचं राजगोपाल म्हणाले.

“केंद्रीय कायद्यांचा विरोध केला नाही”

“मी सभागृहात माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी केंद्रीय कायद्यांचा विरोध केला नाही, किंवा केंद्र सरकारच्या विरोधात गेलो नाही. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.” असं राजगोपाल म्हणाले. जेव्हा एलडीएफ आणि यूडीएफच्या सदस्यांनी अधोरेखित केले, की पंतप्रधान शेतकर्‍यांशी चर्चा करत नाहीत. यावर राजगोपाल म्हणाले की, अशा कोणत्याही चर्चेआधी शेतकरी संघटना कृषी कायदे मागे घेण्याची मागणी रेटून करत आहेत.

“केंद्रीय कायद्याविरोधात असल्याची बातमी निराधार“

राजगोपाल यांनी सभागृहात चर्चेदरम्यान सांगितले की, नवीन कायदे शेतकऱ्यांचे आणि मध्यस्थांच्या हिताचे रक्षण करतील. या कृषी कायद्याचा विरोध करत आहेत ते शेतकऱ्यांच्या विरोधात उभे आहेत. नव्या कायद्यामुळे शेतकर्‍यांची आवक दुप्पट होईल, असा विश्वासही राजगोपाल यांनी व्यक्त केला. आपण केंद्रीय कायद्याविरोधात असल्याची बातमी ‘निराधार’ असल्याचे राजगोपाल म्हणाले. ज्यांनी या प्रस्तावाला विरोध आणि समर्थन केले त्यांना स्पष्टपणे विचारणा न केल्याबद्दल त्यांनी उलट विधानसभा अध्यक्षांनाच दोषी ठरवले.

संबंधित बातम्या :

यूपीए सरकारनं केलेल्या पापाचं प्रायश्चित म्हणजे नवे कृषी कायदे- नरेंद्र मोदी

(Kerala assembly resolution against farm laws BJP MLA Rajagopal retracts)

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...