बनावट अधिकाऱ्यास Z-Plus सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्ही गाडी अन् 5 स्टार हॉटेलची सुविधा

जितेंद्र झंवर, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 17, 2023 | 1:18 PM

जम्मू पोलिसांनी एका ठगाला अटक केली आहे. तो स्वत:ला पीएमओ अधिकारी असल्याचे सांगत होता. त्या जोरावर त्याने अनेक सुविधांचा लाभ घेतला होता.

बनावट अधिकाऱ्यास Z-Plus सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्ही गाडी अन् 5 स्टार हॉटेलची सुविधा
fake pmo officer with security
Image Credit source: social media

जम्मू : पंतप्रधान कार्यालयामधील (PMO) वरिष्ठ अधिकारी आला. मग पोलिसांनी त्याची चांगलीच बडदास्त ठेवली. त्याला  Z-Plus सुरक्षा व्यवस्था पुरवली. त्याला बुलेटप्रूफ एसयूव्ही गाडी दिली गेली. त्याला राहण्यासाठी 5 स्टार हॉटेलची सुविधा दिली गेली. मग त्या पठ्याने टॉप अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या. तो येथेच थांबला नाही तर त्याने SDM रँकच्या अधिकाऱ्यासोबत नियंत्रण रेषेचा (LOC) अनेक वेळा दौरा केला. अनेक महिने ही फसवणूक होत असताना पोलिसांना संशय आला नाही. शेवटी गुप्तचर विभागाने त्याचे पितळ उघडे पाडले अन् त्याला अटक केली गेली.

जम्मू-काश्मीरमधील ही घटना आहे. जम्मू पोलिसांनी त्या ठगाला अटक केली आहे. तो स्वत:ला पीएमओ अधिकारी असल्याचे सांगत होता. त्याचे नाव किरणभाई पटेल आहे अन् तो गुजरातमध्ये राहणारा आहे. तो स्वत:ला पंतप्रधान कार्यालयातील अतिरिक्त संचालक असल्याचे सांगत होता. त्या जोरावर त्याने सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्ही गाडी, पंचतारांकित हॉटेल या सुविधा मिळवल्या.

या व्यक्तीने अनेक महिने काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यात नियंत्रण रेषेचे दौरेही केले. त्यावेळी एसडीएम रँकचा अधिकारी त्याच्या सोबत होता. त्या व्यक्तीने जम्मू-काश्मीरमधील टॉप अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या. तो ऑक्टोंबर २०२२ पासून काश्मीर खोऱ्यात आहे अन् अनेक सुविधांचा लाभ त्याने घेतला.

fake pmo officer

असा सापडला जाळ्यात

त्या ठागाचे संशय सीआयडीला आला. त्यांनी तपास केला असता तो बनावट अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला 10 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती, मात्र ते गुप्त ठेवण्यात आले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणाचा खुलासा केला. त्याच्यावर भादंवि 419, 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पीएचडी पदवीनंतर बनावट कागदपत्रे

या ठगने आपल्या ट्विटर बायोमध्ये पीएचडी केल्याचे लिहिले आहे. मात्र, पोलिस त्याच्या पदवीचाही तपास करत आहेत. त्याने त्यांच्या ट्विटर हँडलवर जम्मू-काश्मीर दौऱ्याचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्याच्यासोबत सीआरपीएफचे जवानही दिसत आहेत.

का घेतल्या बैठका

किरण पटेलने गुजरातमधून पर्यटक आणण्यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या होत्या. तसेच दुधपथरी हे पर्यटनस्थळ करण्यावर चर्चा केली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI