दुःख कमी होणार नाही मात्र…; पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या संजय लेलेच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात अनेक हिंदू शहीद झाले. त्यामधील संजय लेले यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. आता भारताने या दहशतवादी हल्ल्याचा चांगलाच बदला घेतला आहे. भारताने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे. भारताने बुधवारी मध्यरात्री (7 मे) पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने ही कारवाई केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जात आहे. दरम्यान, भारतीय सैन्य दलाकडून करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर पहलगा हल्ल्यात शहीद झालेल्या संजय लेले यांच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे.
पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षद लेले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर आनंद व्यक्त केला आहे. ‘भारतीय सैन्याच्या या कारवाईमुळे खुश आहे. दुःख कमी होणार नाही. मात्र, त्यांचा काहीतरी बंदोबस्त केला याचे समाधान आहे. पाकिस्तान हे सुधारणार नाही त्यांच्यावर सातत्याने असे अटॅक व कारवाई करत राहिली पाहिजे. यावेळ दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले होते. 98% हिंदूंना मारलं. या लोकांवर अशी कारवाई झाली पाहिजे की ते लोक राहिलेच नाही पाहिजे’ असे हर्षद म्हणाले. वाचा: भारताचा सर्वात मोठा शत्रू दहशतवादी मसूद अजहर मारला गेला का? हल्ल्यात जैशचे टॉप कमांडर ठार
वडिलांची आठवण
पुढे ते म्हणाले, मला पुलवामा हल्ल्याच्या वेळची एक गोष्ट आठवली. जेव्हा सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता तेव्हा बाबांनी मला मिठी मारली होती. त्यांना खूप आनंद झाला होता. या वेळी स्वतःच्या बाबतीत हे घडलं आहे. ते जिथे कुठे असतील त्यांना खूप आनंद झाला असेल.
भारताने कोठे किती हल्ले केले?
- मुझफ्फराबादमध्ये भारताने 2 हल्ले केले
- बहावलपूरमध्ये तिसरा हल्ला
- कोटलीमध्ये चौथा
- चाक अमरूमध्ये 5 वा हल्ला
- गुलपूरमध्ये सहावा
- भिंबरमध्ये 7 वा हल्ला
- मुरीदके येथे 8 वा
- सियालकोट येथे 9 वा हल्ला
