AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : भारताचा सर्वात मोठा शत्रू दहशतवादी मसूद अजहर मारला गेला का? हल्ल्यात जैशचे टॉप कमांडर ठार

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदुर'द्वारे जशास तसा बदला घेतला आहे,

Operation Sindoor : भारताचा सर्वात मोठा शत्रू दहशतवादी मसूद अजहर मारला गेला का? हल्ल्यात जैशचे टॉप कमांडर ठार
Operation SindhuImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 07, 2025 | 6:46 AM
Share

भारताने पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. या क्षणाची सर्व भारतीयांना आतुरतेने वाट होती. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य करत हल्ला केला आहे. भारताच्या या हल्ल्यात त्याचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईद आणि मसूद अजहर मारले गेले का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मसूद अजहर आणि हाफिज सईद मारले गेले का?

भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. हल्ल्यात त्याचे मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यात जैशचे 50 दहशतवादी मारले गेले आहेत. याशिवाय, भारताने मुरीदके येथील लष्करच्या तळाला उद्ध्वस्त केले आहे. या हल्ल्यात लष्कर आणि जैशचे अनेक टॉप कमांडर ठार झाले आहेत. मात्र, या हल्ल्यात मसूद अजहर आणि हाफिज सईद मारले गेल्याची माहिती मिळालेली नाही. Mock Drill in Maharashtra : टॉर्च, मेणबत्ती, पैसे तयार ठेवा… तुमच्या शहरात सायरन वाजताच या गोष्टींची काळजी घ्या

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हल्ल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, भारताने आमच्यावर युद्ध करण्यास भाग पाडले आहे. आम्हाला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.

भारताने कोठे किती हल्ले केले?

  • मुझफ्फराबादमध्ये भारताने 2 हल्ले केले
  • बहावलपूरमध्ये तिसरा हल्ला
  • कोटलीमध्ये चौथा
  • चाक अमरूमध्ये 5 वा हल्ला
  • गुलपूरमध्ये सहावा
  • भिंबरमध्ये 7 वा हल्ला
  • मुरीदके येथे 8 वा
  • सियालकोट येथे 9 वा हल्ला

भारताने या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. यामागचे कारणही जाणून घ्या…

  • दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये सुहाग उध्वस्त केले
  • बायकोसमोरच नवऱ्यांना गोळ्या घातल्या
  • धर्म विचारून नवऱ्यांना गोळ्या मारल्या
  • दहशतवादी हल्ल्यातील बळी अनेक नवविवाहित
  • दहशतवाद्यांनी सांगितले, जा मोदींना सांगा
  • हिंदू धर्मात सिंदूर सुहागाची निशाणी
  • मोदी म्हणाले होते, कल्पनेपलीकडील शिक्षा मिळेल
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.