Farmer Protest : ‘जिथे खिळे ठोकले, तिथे फुलं लावणार’, राकेश टिकैत यांची घोषणा, 2 ट्रक मातीही मागवली!

Farmer Protest : 'जिथे खिळे ठोकले, तिथे फुलं लावणार', राकेश टिकैत यांची घोषणा, 2 ट्रक मातीही मागवली!

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे की, गाझीपूर बॉर्डरवर ज्या ठिकाणी पोलिसांनी खिळे ठोकले होते. त्या ठिकाणी आपणं फुलं लावणार आहोत.

सागर जोशी

| Edited By: सचिन पाटील

Feb 05, 2021 | 7:21 PM

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर मोठे खिळे ठोकून आणि सिमेंटच्या भिंती उभारुन खबरदारी घेतली होती. पण पोलिसांची ही खबरदारी केंद्र सरकारच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, खिळे ठोकलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देश-विदेशातून मोदी सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यामुळे रस्त्यांवर ठोकलेले खिळे अखेर पोलिसांना काढावे लागले. पण आता या खिळे ठोकलेल्या जागेवरच फुलं लावणार असल्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे.(Rakesh Tikait will plant flowers at the place where Delhi Police nailed)

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज 72 वा दिवस आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनाचं सिंधू बॉर्डरवर असलेलेलं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. या ठिकाणाहून अखिल भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे की, गाझीपूर बॉर्डरवर ज्या ठिकाणी पोलिसांनी खिळे ठोकले होते. त्या ठिकाणी आपणं फुलं लावणार आहोत आणि त्यासाठी 2 ट्रक माती मागवल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘ग्रेटा थनबर्ग आणि रिहानाला ओळखत नाही’

ग्रेटा थनबर्ग आणि पॉपस्टार रिहाना यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याचं स्वागत राकेश टिकैत यांनी केलं आहे. पण आपण या दोघींनाही ओळखत नसल्याचं टिकैत यांनी म्हटलंय. हे आंतरराष्ट्रीय कलाकार कोण आहेत? त्यांनी आमचं समर्थन केलं असलं तरी मी त्यांना ओळखत नाही, असं टिकैत यांनी पत्रकारांना सांगितलं.

पोलिसांनी रस्त्यांवरील खिळे काढले

गाझीपूर बॉर्डरवर लावलेले खिळे काढतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की, आम्ही सध्या रस्त्यांवरील खिळे काढत आहोत. पण जिथे गरज भासेल तिथे ते पुन्हा लावले जातील. तर दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षाव्यवस्था जैसे थे राहील असं पोलिस उपायुक्त दीपक यादव यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

नरेंद्रसिंह तोमर भडकले; राज्यसभेत म्हणाले काँग्रेसला रक्तापासून शेती करायचीय

‘आंदोलक शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधाही केंद्रानं रोखल्या,’ विरोधी पक्षाच्या खासदारांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

Farmer Protest : 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा – राकेश टिकैत

Rakesh Tikait will plant flowers at the place where Delhi Police nailed

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें