Kisan Andolan : कृषी कायद्याविरोधात आंदोलन आणखी पेटणार, 1500 ट्रकसह 30,000 शेतकरी दिल्लीत धडकणार

Kisan Andolan : कृषी कायद्याविरोधात आंदोलन आणखी पेटणार, 1500 ट्रकसह 30,000 शेतकरी दिल्लीत धडकणार

किसान मजदूर संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आंदोलकांनी त्यांचा एक नवीन काफिला तयार केला आहे. जो रविवारी दिल्लीच्या सीमेपर्यंत दाखल होणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Dec 12, 2020 | 9:51 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन तृषी कायद्याविरोधात (Farm Laws) आंदोलन करणारे शेतकरी (Kisan Andolan) आता आपला लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. भारत बंदनंतर आता शेतकरी आंदोलन आणखी पेटणार असल्याचं दिसत आह. कारण मिळालेल्या माहितीनुसार, बलबीर, भारतीय किसान युनियनचे (Bharatiya Kisan Union) अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल (Balbir S Rajewal) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी दिल्ली-जयपूर रस्ता रोखण्यात येणार आहे. इतकंच नाही तर उपजिल्हाधिकारी कार्यालये, भाजपा नेत्यांच्या घरांसमोर निदर्शनंदेखील करण्यात येणार आहे. यावेळी टोल प्लाझादेखील रोखण्यात येईल. यामध्ये केएमएससी नेत्यांच्या अंदाजाप्रमाणे सुमारे 30,000 शेतकरी ट्रॅक-ट्रॉलीसह दाखल होणार आहेत. (farmers protest against demonstrations held at toll plaza across the country today)

दुसरीकडे, कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पंजाबच्या सात जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजार गावातून 1,500 हून अधिक वाहनं येणार आहेत. त्यापैकी 1,300 ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीकडे येणार आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आंदोलकांनी त्यांचा एक नवीन काफिला तयार केला आहे. जो रविवारी दिल्लीच्या सीमेपर्यंत दाखल होणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. आज आपण समजून घेऊयात नेमका सरकारने पारित केलेला कृषी कायदा काय आहे?, शेतकऱ्यांचा या कृषी कायद्याला विरोध का आहे?, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे मुख्य चेहरे कोणते?, शेतकऱ्यांच्या मागण्या कोणत्या? तसंच सरकारची बाजू काय?

कोणते कृषी कायदे वादग्रस्त? 1 कृषी उत्पादने,व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020 2 हमी भाव व कृषी सेवांचा शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण ) करार कायदा 2020 3 जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा 2020

आंदोलनाचे प्रमुख चेहरे 1) जोगिंदरसिंह उगराहां (भारतीय किसान युनियनचे सर्वेसर्वा) 2) लबीरसिंह राजेवाल (भारतीय किसान युनियनचे थिंक टँक) 3) जगमोहन सिंह (भारतीय किसान युनियनचे डकौंदाचे नेते) 4) डॉ.दर्शन पाल (कृषी संघटनांचे समन्वयक) 5) सरवनसिंह पंधेर (सचिव, किसान-मजदूर संघर्ष समिती) (farmers protest against demonstrations held at toll plaza across the country today)

शेतकऱ्यांना चिंता कशाची? 1) हमी भाव राहील असे सरकार तोंडी म्हणतंय, त्याची खात्री नाही 2) सरकार हमी भावाने शेतमाल खरेदी करणे बंद करेल 3) खाजगी कंपन्या हमी भावाने शेतमाल घेतील याची खात्री नाही 4) कृषी कायद्यांमुळे खाजगी कंपन्यांची खरेदी दरात मनमानी होईल 5) 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी यंदापासून राज्यांना बंद 6) शक्तीशाली कंपन्या शेतकऱ्यांचे शोषण करतील, फसवतील

शेतकऱ्यांच्या काय आहेत मागण्या? 1) तिन्ही कृषी कायदे मागे घ्या 2) हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी अपराध ठरवा 3) किमान हमी भावाचा कायदा करा 4) 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी पुन्हा सुरु करा 5) सरकारकडून धान्य खरेदी चालूच ठेवा 6) कृषी क्षेत्रात भांडवलदारांना मनाई करा 7) राज्यांच्या वैधानिक अधिकारांचा सन्मान करा

काय आहे सरकारचे म्हणणे? 1) तिन्ही कायदे मागे न घेता, त्यात दुरुस्ती करु 2) हमी भावाची कधीच कायद्यात तरतूद नव्हती, आता का करावी? 3) कृषी कायद्यांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील 4) कृषी कायद्यांमुळे खाजगी गुंतवणूक वाढेल 5) शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कुठेही विकता येईल (farmers protest against demonstrations held at toll plaza across the country today)

संबंधित बातम्या

‘अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या’, कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

कृषी कायद्यावरुन भाजप Vs पवार, पवारांच्या आत्मचरित्राचा दाखला देत फडणवीसांकडून घेरण्याचा प्रयत्न

(farmers protest against demonstrations held at toll plaza across the country today)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें