‘अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या’, कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

शेतकरी आंदोलनाबाबत 'जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीवरुन खाली उतरा आणि शेतकऱ्यांचा त्यांचा हक्क आणि अधिकार द्या', अशी खोचक टिप्पणी राहुल गांधी यांनी केली आहे. यापूर्वीही राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावर आपली भूमिका मांडली होती.

'अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या', कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 1:09 PM

नवी दिल्ली: केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलनावर बसले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने अहंकाराची खुर्ची सोडून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार द्यायला हवा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरु आहे. (Rahul Gandhi criticize PM Narendra Modi on farmers agitation)

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात राहुल गांधी यांनी ट्वीट केलंय. ‘अन्नदाता रस्ते-मैदानावर धरणं देत आहे आणि ‘खोटे’ टीव्हीवर भाषण. शेतकऱ्यांच्या मेहनतीचं ऋण आपल्यावर आहे. हे ऋण त्यांना न्याय आणि त्यांचे अधिकार देऊनच उतरवलं जाईल. त्यांच्यावर लाठीमार करुन, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून ते ऋण उतरलं जाणार नाही’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीवरुन खाली उतरा आणि शेतकऱ्यांचा त्यांचा हक्क आणि अधिकार द्या’, अशी खोचक टिप्पणीही राहुल गांधी यांनी केली आहे. यापूर्वीही राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावर आपली भूमिका मांडली होती. काँग्रेस आणि सामान्य जनतेनं सत्य आणि असत्याच्या या युद्धात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं होतं.

काँग्रेसची #SpeakupForFarmers मोहीम

केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध काँग्रेसनं #SpeakupForFarmers ही मोहीम हाती घेतली आहे. त्यात आंदोलक शेतकऱ्यांना समर्थन देताना केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरुद्ध मत मांडण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. ‘मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अत्याचार केला. पहिल्यांचा काळा कायदा आणि आता लाठीमार. पण ते विसरले की जेव्हा शेतकरी आवाज उठवतो तेव्हा त्याचा आवाज संपूर्ण देशात घुमतो’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी #SpeakupForFarmers या मोहीमेत सहभागी होण्यायं आवाहन केलं आहे.

शेतकऱ्यांची शंका राजनाथ दूर करणार- शाह

गेल्या 6 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनानंतर आज अखेर केंद्र सरकारकडून महत्वाचं पाऊल उचलण्यात येत आहे. दुपारी शेतकरी संघटना आणि सरकारच्या मंत्र्यांमध्ये चर्चा होणार आहे. सरकारकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या बैठकीचं नेतृत्व करणार आहेत. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमरही उपस्थित असतील. दरम्यान, सरकार नव्या कृषी कायद्यांवर ठाम राहणार असल्याचं कळतंय. सरकारकडून शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर करण्याचं काम केलं जाईल. त्यांना MSP अर्थात किमान आधारभूत किमतीबाबत विश्वास दिला जाईल, असं शाह यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

कृषी कायद्यावरुन शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न

Farmer Protest | कायद्यांना नाव शेतकऱ्यांचे पण फायदा अब्जाधीश मित्रांचा, प्रियांका गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र

इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर भारतातील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात, सरकारला विचारला जाब

Rahul Gandhi criticize PM Narendra Modi on farmers agitation

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.