Farmer Protest | कायद्यांना नाव शेतकऱ्यांचे पण फायदा अब्जाधीश मित्रांचा, प्रियांका गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विटवरुन व्हिडीओ शेखर करत कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. (Priyanka Gandhi Farmer Protest)

Farmer Protest | कायद्यांना नाव शेतकऱ्यांचे पण फायदा अब्जाधीश मित्रांचा, प्रियांका गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 12:04 PM

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबचे शेतकरी आक्रमक होत दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी केलेली आहे. पंजाबच्या आंदोलक शेतकऱ्यांचे पाचव्या दिवशीदेखील आंदोलन सुरु आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसने स्पीक अप इंडिया अभियानांतर्गत शेतकऱ्यांना पाठिांबा देण्यासाठी #Speakupforfarmers अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Priyanka Gandhi Farmer Protest)

प्रियांका गांधी यांनी ट्विटमधून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. कायद्यांचे नाव कृषी कायदे ठेवण्यात आले आहे, पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा अशी टीका, प्रियांका गांधी यांनी केली.

कृषी कायदे शेतकऱ्यांशी चर्चा न करता कसे बनवले जाऊ शकतात, हा प्रश्न प्रियांका गांधी यांनी केला आहे. या कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष कसे केले जाऊ शकते, असा प्रश्नही त्यांनी विचारला. (Priyanka Gandhi Farmer Protest)

केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे होते. आपण सर्वजण मिळून शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी आवाज उठवू, असं आवाहन प्रियांका गांधींनी केलं आहे. पंजाबवरुन आलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओतून करण्यात आले आहे.

प्रियांका गांधींनी यापूर्वी देखील पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन केंद्र सरकारवर टीका केली होती. ज्यावेळी भाजपचे अब्जाधीश उद्योगपती मित्र दिल्लीत येतात त्यावेळी त्यांना रेड कार्पेट टाकले जाते. मात्र, ज्यावेळी शेतकरी दिल्लीकडे येण्यासाठी निघतात त्यावेळी रस्ते खोदले जातात, असं टीकास्त्र प्रियांका गांधींनी केंद्रावर सोडलं होते. (Priyanka Gandhi Farmer Protest)

केंद्र सरकार शेतकऱ्यांविरोधात कायदा बनवते हे चालते. पण शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत आले तर ते चुकीचे कसे असू शकते, असा प्रश्न प्रियांका गांधींनी उपस्थित केला होता.

दरम्यान, पंजाबच्या शेतकऱ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरु आहे. गुरुनानक जयंती आंदोलकांकडून साजरी करण्यात आली.

संबंधित बातम्या: 

शेतकरी आंदोलकांकडून दिल्ली जाम करण्याचा इशारा; नड्डांच्या घरी रात्री उशिरा बैठक

आंदोलनाचं ठिकाण बदलण्याच्या अटी अमान्य, शेतकऱ्यांनी अमित शाह यांच्या चर्चेचं आमंत्रण फेटाळलं

(Priyanka Gandhi Farmer Protest)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.