AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली हिंसेमागे भाजप नेत्याचाही हात, चौकशी करा; सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसेवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. ('farmers’ tractor rally on Republic Day dents ‘tough guy’ image of PM Modi, Amit Shah' )

दिल्ली हिंसेमागे भाजप नेत्याचाही हात, चौकशी करा; सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर
| Updated on: Jan 28, 2021 | 11:19 AM
Share

नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसेवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. स्वामींनी ट्विट करून लाल किल्ल्यावर झालेल्या गडबडीमागे पीएमओच्या जवळच्या भाजप नेत्याचा हात असल्याचा संशय सोशल मीडियातील वृत्ताच्या आधारे व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. (‘farmers’ tractor rally on Republic Day dents ‘tough guy’ image of PM Modi, Amit Shah’ )

सुब्रमण्यम स्वामी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी हा संशय व्यक्त केला आहे. सध्या एक चर्चा सुरू आहे. कदाचित ती खोटी असू शकते किंवा शत्रूंच्या आयडीवरूनही ही चर्चा सुरू असू शकते. पीएमओच्या जवळ असलेल्या एका भाजपच्या सदस्याने लाल किल्ल्यावर जाऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याचा तपास करून खुलासा व्हावा, असं स्वामींनी म्हटलं आहे.

ट्विट रिट्विट करून भाजपची डोकेदुखी वाढवली

स्वामी एवढ्यावरच थांबलेले नाही तर त्यांनी अभिनेता दीप सिद्धू यांच्याशी संबंधित एक ट्विट रिट्वीट केलं आहे. लाल किल्ला परिसरात उसळलेल्या हिंसेतील आरोपी दीप सिद्धू हा भाजपचे खासदार सनी देओल यांच्या प्रचार कँम्पेनर होता, असं या ट्विट मध्ये लिहिलं होतं. स्वामींनी हे ट्विट रिट्विट करून भाजपची गोची केली आहे.

मोदी-शहांची प्रतिमा मलिन

स्वामींनी आणखी एक ट्विट करून काही प्रश्न उपस्थित करतानाच भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत. या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांची प्रतिष्ठाही धुळीस मिळवली आहे, असंही त्यांनी म्हटलं. त्यांनी पंजाबमधील काँग्रेस सरकारवरही टीका केली आहे. दिल्लीतील हिंसेवरून तर्क-वितर्क सुरू असतानाच स्वामींनी ट्विटरवरून आपल्याच पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याने भाजप समोरच्या अडचणीत वाढ झाली आहे. (‘farmers’ tractor rally on Republic Day dents ‘tough guy’ image of PM Modi, Amit Shah’ )

काय घडलं होतं रॅलीत?

मंगळवार 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. शेतकऱ्यांचा एक जत्था गाजीपूर बॉर्डरवरून आयटीओला पोहोचला होता. हा जत्था लाल किल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरधाम-नोएडा मार्गावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आऊटर रिंगरोडवरून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गाने न जाता आंदोलकांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. ही दगडफेक सुरू होताच पोलिसांनीही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडल्या. शेतकऱ्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. परिणामी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला. (‘farmers’ tractor rally on Republic Day dents ‘tough guy’ image of PM Modi, Amit Shah’ )

संबंधित बातम्या:

LIVE | महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन, कुठे फेडाल हे पाप?, शेतकरी आंदोलन हिसांचारावरुन भाजपचा हल्लाबोल

Delhi Tractor Rally | दिल्लीत शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप असलेला दिप सिद्धू कोण आहे? त्यानं खरंच भडकावलं?

PM Kisan: लवकरच 1.6 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये, अर्जात त्रुटी असेल तर काय कराल?

(‘farmers’ tractor rally on Republic Day dents ‘tough guy’ image of PM Modi, Amit Shah’ )

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.