AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गगनचुंबी इमारतीत एसीचा ब्लास्ट, भयंकर आग लागताच आरडाओरडा आणि किंचाळ्या; मदतीसाठी लोक धावले सैरावैरा

noida fire : नोएडामधील 21 मजली इमारतीमधील एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे इमारतमधील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

गगनचुंबी इमारतीत एसीचा ब्लास्ट, भयंकर आग लागताच आरडाओरडा आणि किंचाळ्या; मदतीसाठी लोक धावले सैरावैरा
| Updated on: Jun 29, 2026 | 11:46 AM
Share

उत्तर प्रदेशातील नोएडामधील एका सोसायटीत एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नोएडाच्या सेक्टर-119 मधील ‘द अरण्य सोसायटी’मधील एका फ्लॅटमधील एसीचा स्फोट झाल्याचे समोर आलं आहे. 21 मजली इमारतीमधील एका फ्लॅटला आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. आग लागल्यानंतर लोकांची आरडाओरड आणि किंचाळ्या ऐकायला मिळाल्या. लोकांची आरडाओरड ऐकून इमारतीखाली उभे असलेल्या लोकांनी मदतीसाठी धावाधाव केली.

इमारतीच्या एका फ्लॅटला आग लागल्यानंतर सर्वत्र धुराचे लोट पसरू लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केलं.

प्राथमिक माहितीनुसार, एसीचा (AC) स्फोट होऊन आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीच्या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवानांनी आगीवर पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मजली अरण्य सोसायटीतील एका फ्लॅटला सोमवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. सूचना मिळताच सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या घटनेनंतर मुख्य अग्निशमन दलाचे अधिकारी आणि गौतम बुद्ध नगरमधील स्थानिक पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. तसेच या प्लॅटमध्ये कोणताही व्यक्ती अडकलेला नाही, तसेच कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.

https://x.com/ANINewsUP/status/2071468617179537912

अग्निशमन दलाचे अधिकारी म्हणाले, ‘आग एसीचा स्फोट किंवा शॉर्ट सर्किटमुळे झाल्याची शक्यता आहे. परंतु तपास केल्यानंतर आगीचं खरं कारण समोर येईल. आगीमुळे फ्लॅटचं किती नुकसान झालं, याचीही पाहणी केली जात आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रदीप चौबे यांनी सांगितलं की, ‘नोएडाच्या 119 येथील अरण्या सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये आग(Fire)  लागल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पथकाला तातडीने घटनास्थळी पाठवलं. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. या घटनेत जिवितहानी झालेली नाही. तपासानंतर आगीचं कारण समोर येईल’.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे